Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सोने तारण फसवणूक प्रकरणातील संशयित मुथूट फिनकॉर्प मॅनेजर स्नेहा जामसंडेकरना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी..

सोने तारण फसवणूक प्रकरणातील संशयित मुथूट फिनकॉर्प मॅनेजर स्नेहा जामसंडेकरना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी..

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर व ग्रामीण भागातील काही नागरिकांचे सोन्याचे दागिने तारण ठेवून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत तब्बल ६ कोटी ९ लाख ६१ हजार ५१५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मुख्य संशयित आरोपी स्नेहा जामसंडेकर यांची ५ दिवसाची पोलिस कोठडी संपताच. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.

सोने तारण फसवणून प्रकरणी कोळंब सरपंच सिया रामचंद्र धुरी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ‘मुथ्थुट फिनकॉर्प’च्या मालवण शाखेच्या मॅनेजर स्नेहा निहाल जामसंडेकर, कर्मचारी तन्मय मंगेश पराडकर, स्नेहल राजन आचरेकर तसेच एजंट हर्षदा रमाकांत आडकर या चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य संशयित आरोपी तथा शाखा व्यवस्थापक स्नेहा जामसंडेकर यांना बुधवारी २ सप्टेंबर रोजी रात्री अटक केली. गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी मुदत संपताच संशयित आरोपी स्नेहा जामसंडेकर यांना मंगळवारी मालवण न्यायालयात हजर केले होते. मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. याकामी सरकार पक्षातर्फे अभियोक्ता ॲड. उज्वला जाधव यांनी बाजू मांडली व मूळ फिर्यादीतर्फे ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर, ॲड. तारिका चिंदरकर कुबल, ॲड ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर, ॲड.विवेक कुमार निषाद (उच्च न्यायालय) यांनी सरकार पक्षास सहाय्य केले. दरम्यान, या प्रकरणातील अन्य तीन संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सोन्याचे दागिने तारण ठेवून सुमारे 120 पेक्षा अधिक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. अश्या स्वरूपात तक्रार आहेत.

ruchira top