Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कोकणच्या दशावतार कलेचा गणेशमूर्तीतून सुरेख आविष्कार

कोकणच्या दशावतार कलेचा गणेशमूर्तीतून सुरेख आविष्कार

दशावतार पोशाखातील साडेसहा फुटी गणेशमूर्ती मुंबई परेलला रवाना

मालवणचे युवा मूर्तिकार हेमंत रामाडे व सहकारी यांनी साकारली लक्षवेधी कलाकृती


मंगेश नलावडे | मालवण : कोकणच्या मातीतील पारंपरिक दशावतार कलेचे आकर्षण सर्वांनाच आहे. याच कलेचा सुंदर आविष्कार मुंबई परेल येथील तकदिर टेरेस मित्र मंडळाच्या माध्यमातून यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांचे लक्ष वेधणार आहे. मालवणच्या श्री गणेश चित्रशाळेत युवा मूर्तिकार हेमंत रामाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दशावतार पोशाखातील सुमारे साडेसहा फूट उंचीची आकर्षक गणेशमूर्ती साकारली असून, गणेश चतुर्थी उत्सवानिमित्त ही मूर्ती मुंबई येथील परेल तकदिर टेरेस मित्र मंडळाकडे रवाना झाली आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात श्री गणेश चित्रशाळेतून मुंबईला रवाना होणारी ही पहिली गणेशमूर्ती ठरली आहे. कोकणातील पारंपरिक दशावताराची ओळख आणि गणेशमूर्तीचे कलात्मक रूप यांचा सुरेख संगम या मूर्तीमध्ये साधण्यात आला आहे. त्यामुळे ही मूर्ती पाहणाऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

पारंपरिक कलेला आधुनिक कलाविष्काराची जोड

यावर्षी परेल तकदिर टेरेस मित्र मंडळाने कोकणातील पारंपरिक दशावतार या विषयावर गणेशमूर्ती साकारण्याची संकल्पना मांडली होती. मंडळाच्या वतीने किशोर कांदळगांवकर यांनी ही संकल्पना मूर्तिकार हेमंत रामाडे यांच्यासमोर मांडली. त्यानंतर रामाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संकल्पनेला मूर्त रूप देत ही देखणी गणेशमूर्ती साकारली.

मूर्ती तयार करण्यासाठी सुमारे सात ते आठ दिवसांचा कालावधी लागला. गणेशमूर्तीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार व सहकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. दशावतारातील पारंपरिक वेशभूषा, कलात्मक बारकावे आणि गणेशरूप यांचा योग्य मेळ साधत ही अनोखी कलाकृती साकारण्यात आली आहे.

पूर्वीही साकारल्या वेगळ्या संकल्पनेतील मूर्ती

परेल तकदिर टेरेस मित्र मंडळासाठी श्री गणेश चित्रशाळेत यापूर्वीही विविध वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांवर गणेशमूर्ती साकारण्यात आल्या आहेत. २०१० मध्ये २१२१ मोदकांची संकल्पना असलेली गणेशमूर्ती तयार करण्यात आली होती. त्यानंतर मंडळाच्या माध्यमातून आयर्लंड येथील गार्डनमध्ये तबला वाद्य वाजविणाऱ्या स्वरूपातील गणेशमूर्तीची ऑर्डरही देण्यात आली होती. तसेच कापसाच्या मोदकांची संकल्पना असलेली गणेशमूर्तीही श्री गणेश चित्रशाळेतून साकारण्यात आली आहे.

ट्रान्सपोर्टमधून मुंबईकडे रवाना

मालवण येथून ट्रान्सपोर्ट वाहनातून ही साडेसहा फुटी गणेशमूर्ती मुंबईकडे रवाना करण्यात आली असून, मंडळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत ती सुरक्षितपणे पोहोचविण्यात येणार आहे. कोकणच्या पारंपरिक दशावतार कलेला गणेशमूर्तीच्या माध्यमातून मुंबईतही वेगळ्या स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न या कलाकृतीतून करण्यात आला आहे.


ही मूर्ती साकारण्यासाठी राकेश वेंगुर्लेकर, योगेश परब, हर्षद तळवडेकर, अतुल सांडव, सिद्धार्थ परब, गौरी मेस्त्री, निनाद आडकर, वैभव खूरदरे, साई दांडकर, योगिता रामाडे, दीप मुंबरकर, गौरांग कोचरेकर, पार्थ आचरेकर, दर्शन गांवकर, चेतन केणी, वेदिका प्रभू आणि हर्षद पाटकर यांचे सहकार्य लाभले. अशी माहिती गणेशमूर्तिकार हेमंत रामाडे यांनी दिली.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top