Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

सिंधुदुर्गातील जलपर्यटन व्यावसायिकांसाठी ‘मैत्री पोर्टल’वर नोंदणी सुरू

सिंधुदुर्गातील जलपर्यटन व्यावसायिकांसाठी ‘मैत्री पोर्टल’वर नोंदणी सुरू


निवती लाईट हाऊस परिसर ‘झोन २’मध्ये समाविष्ट करण्याची मागणी

पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आ. दिपक केसरकर यांचे लक्ष वेधणार

पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलपर्यटन व्यवसायिकांसाठी राज्य शासनाच्या ‘मैत्री पोर्टल’वर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया १ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील नौकाविहार, कयाकिंग, वॉटर स्पोर्ट्स आदी जलपर्यटन व्यवसायिकांनी या पोर्टलवर तातडीने ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने २४ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील साहसी पर्यटन उपक्रमांना धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्गातील जलपर्यटन व्यवसायासाठी आवश्यक परवानग्या देण्याचा अधिकार पर्यटन संचालनालय, कोकण विभागाकडे असून, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला (MMB) जलपर्यटन व्यवसायासाठी परवानगी देण्याचा अधिकार नसल्याची ठाम भूमिका विष्णू मोंडकर यांनी मांडली आहे.

सध्या जलपर्यटन व्यवसायाच्या नोंदणीसाठी ‘मैत्री पोर्टल’वर प्रक्रिया सुरू झाली असून, अद्याप जिल्ह्यातून एकही अर्ज दाखल झालेला नसल्याचे महासंघाने म्हटले आहे. त्यामुळे सर्व जलपर्यटन व्यावसायिकांनी ऑनलाइन नोंदणी पूर्ण करावी. भविष्यात ही नोंदणी जिल्हास्तरावर ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठीही महासंघाचे प्रयत्न सुरू असल्याचे मोंडकर यांनी सांगितले.

दरम्यान, निवती लाईट हाऊस सागरी सफारीच्या नियमांवरून निर्माण झालेला तांत्रिक पेच हा सध्या जलपर्यटन व्यावसायिकांसमोरील महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. मालवण बंदर, तारकर्ली, देवबाग, वेंगुर्ला तसेच निवती येथून निवती लाईट हाऊस परिसराची सागरी सफारी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरली आहे. मात्र, बंदर निरीक्षकांनी काढलेल्या परिपत्रकानुसार निवती लाईट हाऊस किनाऱ्यापासून सुमारे ५.२९ नॉटिकल मैल म्हणजेच जवळपास ९.८ किलोमीटर अंतरावर आहे.

मेरीटाईम बोर्डाच्या भूमिकेनुसार, इनलँड व्हेसल्स ॲक्ट (IV Act) अंतर्गत नोंदणीकृत बोटींना त्यांच्या निर्धारित क्षेत्राबाहेर खुल्या समुद्रात जाण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे निवती लाईट हाऊसपर्यंत पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी मर्चंट शिपिंग ॲक्ट अंतर्गत IRS नोंदणी आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे स्थानिक जलपर्यटन व्यावसायिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

निवती परिसराचा ‘झोन २’मध्ये समावेश करण्याची मागणी

या निर्णयाला पर्यटन व्यावसायिक महासंघाने आक्षेप घेतला असून, निवती लाईट हाऊस परिसराचा इनलँड व्हेसल्स ॲक्ट २०२१ अंतर्गत ‘झोन २ – Categorized Waters’मध्ये समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सागरी लाटांची तीव्रता, समुद्राचे भौगोलिक स्वरूप आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करून सागरी क्षेत्रांचे वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य शासन व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे आहेत. त्यामुळे निवती परिसराचा झोन २ मध्ये समावेश करून स्थानिक पर्यटन बोटींच्या नोंदणीत आवश्यक ते बदल करावेत, अशी महासंघाची मागणी आहे.

लहान व्यावसायिकांना IRS नोंदणी परवडणारी नाही

लहान आणि स्थानिक पर्यटन बोटींना IRS नोंदणीची अट घालणे आर्थिकदृष्ट्या तसेच प्रक्रियेच्या दृष्टीने अडचणीचे असल्याचे महासंघाने म्हटले आहे. ही अट कायम राहिल्यास मालवण, दांडी, तारकर्ली, निवती परिसरातील शेकडो स्थानिक भूमिपुत्रांच्या पारंपरिक रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पर्यटकांची सुरक्षितता ही व्यावसायिकांचीही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगताना, बोटींमध्ये VHF रेडिओ संच, लाइफ राफ्ट, पुरेसे लाइफ जॅकेट, GPS प्रणाली आणि नेव्हिगेशन लाइट्स यांसारख्या आवश्यक सुरक्षा साधनांची पूर्तता करण्यास व्यावसायिक पूर्णपणे तयार असल्याचे मोंडकर यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री व आमदारांची लवकरच भेट घेणार

या संपूर्ण विषयावर तोडगा काढण्यासाठी पर्यटन महासंघाच्या माध्यमातून जलक्रीडा व्यवसायिकांना सोबत घेऊन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांची लवकरच भेट घेण्यात येणार आहे. प्रशासन आणि जलपर्यटन व्यावसायिक यांच्यात समन्वय साधून पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू राहावा आणि स्थानिकांचा रोजगार टिकून राहावा, यासाठी लोकप्रतिनिधी या विषयात लक्ष घालून योग्य निर्देश देतील, असा विश्वास विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केला.

ruchira top