Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सोनेतारण फसवणूक प्रकरणातील पीडित महिलांच्या खंबीरपणे पाठीशी !

सोनेतारण फसवणूक प्रकरणातील पीडित महिलांच्या खंबीरपणे पाठीशी !


भाजपा सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी व्यक्त केला ठाम विश्वास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची पीडितांसोबत भेट घेणार


मंगेश नलावडे | मालवण : मुथूट फिनकॉर्प, मालवण शाखेतील सोनेतारण फसवणूक प्रकरणातील पीडित मच्छीमार महिलांच्या पाठीशी महिला म्हणून खंबीरपणे उभी राहणार असल्याचा विश्वास भाजपा महिला सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची गंभीरता वरिष्ठ नेतृत्वाच्या निदर्शनास आणून देत भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेतील कर्मचारी व इतर संबंधित व्यक्तींनी केलेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुमारे १२० मच्छीमार महिला व इतर नागरिकांचे तब्बल नऊ किलो सोने अडकले असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या फसवणुकीला बळी पडलेल्या आणखी काही नागरिकांकडून तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

या पार्श्वभूमीवर पीडित महिलांची पुढील वाटचाल, कायदेशीर मार्गदर्शन तसेच आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी धुरीवाडा येथील ‘संस्कार हॉल’मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस श्वेता कोरगावकर यांनी उपस्थित राहून पीडित मच्छीमार महिलांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेतल्या. महिलांची झालेली फसवणूक ही गंभीर बाब असून, या प्रकरणात महिला आयोगाकडे दाद कशी मागता येईल, याबाबतही पीडित महिलांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. संकटाच्या काळात पीडित महिलांना कायदेशीर तसेच प्रशासकीय पातळीवर आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे कोरगावकर यांनी स्पष्ट केले.
बैठकीनंतर श्वेता कोरगावकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती व प्रगतीबाबत माहिती घेतली.दरम्यान, संकटाच्या काळात मालवण येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून पीडित महिलांच्या लढ्याला पाठबळ देत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे सोबत राहण्याचा विश्वास दिल्याबद्दल पीडित महिलांनी श्वेता कोरगावकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी भाजपा गटनेत्या अन्वेशा आचरेकर, माजी महिला व बालकल्याण सभापती पूजा सरकारे, श्रमजीवी रापण संघाचे दिलीप घारे, रविकिरण तोरसकर, मुख्य तक्रारदार तथा कोळंब सरपंच सिया धुरी, कविता मोंडकर, रुपेश प्रभू, दाजी जोशी, माधुरी प्रभू, कायदेशीर सल्लागार, सोनेतारण फसवणूक तक्रार निवारण मंचाचे पदाधिकारी, तसेच बहुसंख्य पीडित मच्छीमार महिला व नागरिक उपस्थित होते.

ruchira top