मालवण | प्रतिनिधी: मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी कॉमर्सचा विद्यार्थी देवांग चव्हाण याने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये अंडर-१९ वूशु क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली असून त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ही जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा देवगड तालुक्यातील कुणकेश्वर हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देवांगने आपल्या जिद्द, मेहनत, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करत विभागस्तरीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. देवांग याच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

देवांग चव्हाणची विभागस्तरीय वूशु स्पर्धेसाठी निवड
