Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

रेकोबा विद्यालयाच्या गौरांग मालंडकरची महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट संघात निवड

रेकोबा विद्यालयाच्या गौरांग मालंडकरची महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट संघात निवड


मालवण | प्रतिनिधी : मालवण-वायरी येथील रेकोबा विद्यालयातील इयत्ता नववीत शिकणाऱ्या गौरांग रामचंद्र मालंडकर याची महाराष्ट्र राज्याच्या १७ वर्षांखालील टेनिस क्रिकेट संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे रेकोबा विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

उत्तर प्रदेश येथे १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड चाचणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे घेण्यात आली. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित या निवड चाचणीत राज्यातील विविध खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या चाचणीत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत गौरांग मालंडकर याने महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील राज्य संघात स्थान मिळविले.
गौरांग हा अष्टपैलू खेळाडू असून त्याने आपल्या खेळातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर ही निवड निश्चित केली. त्याला रेकोबा विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. फणसेकर यांचे मार्गदर्शन लाभले. गौरांगच्या या यशाबद्दल रेकोबा विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय खोचरे, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे

ruchira top