Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पुरळच्या प्रशासक सरपंच अनुश्री तावडे यांच्यासह पदाधिकारी भाजपमध्ये

पुरळच्या प्रशासक सरपंच अनुश्री तावडे यांच्यासह पदाधिकारी भाजपमध्ये


पुरळमध्ये उबाठा सेनेला धक्का

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी झाला पक्षप्रवेश


कणकवली : सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश येथे पुरळ येथील उबाठा सेनेच्या प्रशासक सरपंच अनुश्री संतोष तावडे, संतोष वसंत तावडे आणि रुचिता रूपेश पुरळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे पुरळ परिसरात उबाठा सेनेला धक्का बसला असून भाजपची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत तिघांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पालकमंत्री राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.
या पक्षप्रवेशावेळी पडेल मंडल अध्यक्ष महेश (बंड्या) नारकर, भाजप जिल्हा सचिव संदीप साटम,ओबीसी मंडल अध्यक्ष भूषण पोकळे, जिल्हा परिषद गटनेते संजय बोबडी, पंचायत समिती सदस्य अंकुश ठुकरूल, वाडा सरपंच सुनील जाधव, मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, गौरव बोबडी तसेच मंडल प्रभारी डॉ. अमोल तेली,अमित साटम, मिलिंद साटम, फरीद काझी आदी उपस्थित होते.
पुरळ परिसरातील स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी काळात पक्षाला संघटनात्मकदृष्ट्या त्याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तावडे यांच्या प्रवेशामुळे तेथील उबाठाची सत्ता संपली आहे. पक्षाच्या विचारधारेनुसार आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली परिसराच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला.

ruchira top