Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

३५० वर्षे जुन्या पिंपळाची भलीमोठी फांदी कोसळली

३५० वर्षे जुन्या पिंपळाची भलीमोठी फांदी कोसळली


धामापूर भगवती मंदिर परिसरात मोठे नुकसान

धामापूर | प्रतिनिधी :
जागतिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील धामापूर तलाव व श्री देवी भगवती मंदिर परिसरातील सुमारे ३५० वर्षे जुन्या पिंपळ वृक्षाची मोठी फांदी रविवारी, ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास अचानक कोसळली. यात भगवती मंदिराशेजारील श्री देवी सातेरी मंदिरासमोरील मंडप तसेच मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीचे मोठे नुकसान झाले. तसेच परिसरातील विद्युत पोल व वीजवाहिन्या तुटल्याने वीज वितरण कंपनीचेही नुकसान झाले. सुदैवाने यावेळी मंदिर परिसरात कोणीही उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच धामापूरच्या सरपंच सौ. मानसी परब यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तलाठी समीरा सावंत, पोलीस पाटील विनायक प्रभू, वायरमन सागर गावठे आणि योगेश काळसेकर यांना दूरध्वनी करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर तलाठी समीरा सावंत यांनी नुकसानीचा पंचनामा केला. दरम्यान, वायरमन सागर गावठे आणि योगेश काळसेकर यांनी वीज वितरण कंपनीच्या पथकासह घटनास्थळी दाखल होत युद्धपातळीवर काम सुरू केले. अवघ्या दोन तासांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
यावेळी सरपंच सौ. मानसी परब यांच्यासमवेत उपसरपंच रमेश निवतकर, दत्तात्रय देसाई, माजी सरपंच ज्ञानेश्वर परब, दीपक गावडे, सचिन मराठे, ओमकार सुतार, दिनेश गावडे, संदीप राऊळ, भालचंद्र परब, प्रवीण परब, प्रशांत परब, महेश परब, बापू देसाई, सुनील देसाई, सिद्धेश परब, सुधीर नाईक, विनय मराठे, संतोष मराठे, श्यामसुंदर परब आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, स्थानिक तरुणांनी तत्काळ मदतकार्यात सहभागी होत कोसळलेली फांदी तोडून बाजूला केली. उर्वरित पिंपळ वृक्ष धोकादायक स्थितीत असल्याने भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी हा वृक्ष लवकरात लवकर तोडण्यात यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. सुट्टीचा दिवस असूनही तातडीने घटनास्थळी उपस्थित राहून नुकसानीचा पंचनामा केल्याबद्दल तलाठी समीरा सावंत तसेच तत्परतेने वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्दल वायरमन सागर गावठे आणि योगेश काळसेकर यांचे उपस्थित नागरिकांनी विशेष आभार मानले.

ruchira top