Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सोने तारण फसवणूक प्रकरणातील संशयित स्नेहा जामसंडेकरना अटक

सोने तारण फसवणूक प्रकरणातील संशयित स्नेहा जामसंडेकरना अटक


न्यायालयाकडून ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; अन्य तीन संशयितांचा शोध सुरू

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर व ग्रामीण भागातील काही नागरिकांचे सोन्याचे दागिने तारण ठेवून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत तब्बल ६ कोटी ९ लाख ६१ हजार ५१५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मुख्य संशयित आरोपी स्नेहा जामसंडेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, अन्य तीन संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

या प्रकरणी कोळंब गावच्या सरपंच सिया रामचंद्र धुरी यांच्या तक्रारीवरून दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी ‘मुथ्थुट फिनकॉर्प’च्या मालवण शाखेच्या मॅनेजर स्नेहा जामसंडेकर, कर्मचारी तन्मय पराडकर, सेन्हल आचरेकर तसेच एजंट हर्षदा आडकर या चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य संशयित आरोपी तथा शाखा व्यवस्थापक स्नेहा जामसंडेकर यांना बुधवारी रात्री अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील अन्य तीन संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सोन्याचे दागिने तारण ठेवून सुमारे 120 नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याच्या या प्रकारामुळे मालवण शहरासह ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

ruchira top