Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

युवा उद्योजक संग्राम साळसकर यांना ‘महाराष्ट्र आयडॉल युवा उद्योगरत्न’ पुरस्कार

युवा उद्योजक संग्राम साळसकर यांना ‘महाराष्ट्र आयडॉल युवा उद्योगरत्न’ पुरस्कार


‘संग्राम काजू फॅक्टरी’च्या माध्यमातून उभारला स्वतःचा ब्रँड; मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मुंबईत सन्मान

मालवण | प्रतिनिधी :
मालवण तालुक्यातील महान गावचे युवा उद्योजक संग्राम साळसकर यांनी अल्पावधीत ‘संग्राम काजू फॅक्टरी’ हा स्वतःचा ब्रँड उभारून काजू उद्योगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘महाराष्ट्र आयडॉल युवा उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात आयोजित ‘ग्लोबल महाराष्ट्र उद्योग परिषद’ व ‘महाराष्ट्र उद्योगरत्न सन्मान सोहळ्या’त महाराष्ट्राचे फलोद्यान मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते संग्राम साळसकर यांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला दत्तात्रय वारे गुरुजी, समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. दीपक परब, सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष अजित मराठे, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, शिवस्वराज्य मराठी लोक चळवळीचे संस्थापक संजय यादवराव, राजश्री यादवराव, राम कोळवणकर आणि नरेंद्र बामणे यांच्यासह महाराष्ट्रभरातील सुमारे ५०० उद्योजक, युवा उद्योजक व मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातून उद्योगाची सुरुवात करून ‘संग्राम काजू फॅक्टरी’च्या माध्यमातून स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याबरोबरच कोकणातील काजू उद्योगाला आधुनिक ब्रँडिंगची जोड देण्याचे काम साळसकर यांनी केले आहे. त्यांच्या या उद्योजकीय वाटचालीतून तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग उभारून रोजगारनिर्मिती करावी, असा प्रेरणादायी संदेश मिळत आहे.
मराठी उद्योजकतेला व्यापक व्यासपीठ मिळवून देणे, युवा पिढीला उद्योग क्षेत्राकडे आकर्षित करणे आणि रोजगारनिर्मितीला चालना देणे, हा परिषदेचा प्रमुख उद्देश होता. संग्राम साळसकर यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top