Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत वेदांत-आराध्याची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत वेदांत-आराध्याची चमकदार कामगिरी


वराडकर हायस्कूलच्या दोन्ही जलतरणपटूंनी पटकावला द्वितीय क्रमांक

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने क्रीडा दिनाचे औचित्य साधून ओरोस येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. १७ वर्षांखालील मुलांच्या १०० मीटर फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात वेदांत विनायक पोफळे, तर मुलींच्या याच प्रकारात आराध्या बाळकृष्ण वाजंत्री यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

ओरोस येथे झालेल्या या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत वराडकर हायस्कूलचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी वेदांत पोफळे याने १७ वर्षांखालील मुलांच्या १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सहभाग घेतला. याच गटातील मुलींच्या १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात प्रशालेची विद्यार्थिनी आराध्या वाजंत्री हिने सहभाग नोंदविला. दोन्ही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
विशेष म्हणजे वेदांत पोफळे आणि आराध्या वाजंत्री यांनी पहिल्याच जलतरण स्पर्धेत जिल्हास्तरीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामुळे वराडकर हायस्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.

या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक संजय पेंडूरकर, किसन हडलगेकर, भूषण गावडे तसेच जलतरण प्रशिक्षक प्रवीण सुलोकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केलेल्या सरावाचे आणि मेहनतीचे हे यश असल्याचे प्रशालेतून सांगण्यात आले.वेदांत पोफळे व आराध्या वाजंत्री यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर, संस्थाचालक, मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top