Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

५२ वर्षांची अविरत सेवा!

५२ वर्षांची अविरत सेवा!

तबला मेकर्स आबा साळुंखे यांचा हिंदू धर्माभिमानी मंडळींतर्फे सत्कार

वेंगुर्ला | प्रतिनिधी :
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गेली तब्बल ५२ वर्षे वेंगुर्ला शहरात येऊन भजनी मंडळांना दर्जेदार वाद्ये उपलब्ध करून देणारे सांगली जिल्ह्यातील वसंत उर्फ आबा साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा वेंगुर्ल्यातील हिंदू धर्माभिमानी मंडळींच्यावतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. पाच दशकांहून अधिक काळ वाद्यनिर्मिती व दुरुस्तीच्या माध्यमातून भजन परंपरेला दिलेल्या त्यांच्या योगदानाची यावेळी विशेष दखल घेण्यात आली.
भजन हा प्रकार आता वर्षभर सुरू असला तरी गणेश चतुर्थीच्या काळात त्याला विशेष महत्त्व प्राप्त होते. गणेशोत्सवाचे वेध लागताच विविध भजनी मंडळांकडून तबला, पखवाज आदी वाद्यांची दुरुस्ती करून घेण्यासाठी तसेच नवीन वाद्ये खरेदी करण्यासाठी लगबग सुरू होते. अशा वेळी भजनी मंडळांना दर्जेदार वाद्ये उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम आबा साळुंखे गेल्या ५२ वर्षांपासून अविरतपणे करीत आहेत.

मूळचे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील साळुंखे कुटुंबीय दरवर्षी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून वेंगुर्ल्यात दाखल होतात. वर्षातील सुमारे दोन ते अडीच महिने ते वेंगुर्ल्यात वास्तव्यास राहून नवीन वाद्यांची निर्मिती तसेच जुन्या वाद्यांची दुरुस्ती करतात. आपल्या कौशल्यपूर्ण कामातून त्यांनी वेंगुर्ल्यातील भजनी मंडळांचा विश्वास संपादन केला आहे.

माणिकचौक येथील विठ्ठल मंदिरात १ सप्टेंबर रोजी झालेल्या या सत्कार समारंभात प्रसन्ना देसाई, महादेव मेस्त्री, संजय तेरेखोलकर, नित्यानंद आठलेकर, भाऊ केरकर, प्रा. सुनील नांदोस्कर, अभि वेंगुर्लेकर, अनिल नांदोस्कर, कुमार कामत, आपा धोंड, पी. के. कुबल आणि प्रथमेश गुरव आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. सुनील नांदोस्कर यांनी मुलाखतीच्या माध्यमातून आबा साळुंखे यांच्या वेंगुर्ल्यातील ५२ वर्षांच्या प्रवासामागची पार्श्वभूमी जाणून घेतली. आपल्या आठवणींना उजाळा देताना आबा साळुंखे म्हणाले, “वाद्य दुरुस्ती करणारा घडशी समाज अशी आमची ओळख आहे. सुरुवातीला आम्ही मालवण येथे वाद्य दुरुस्तीची कामे करायचो. त्यावेळी वेंगुर्ल्याचे ज्योतिषी भाऊ आंबार्डेकर यांच्याशी ओळख झाली. त्यांनीच आम्हाला वेंगुर्ल्यात आणले. वेंगुर्ल्यात आल्यानंतर व्यवसायासाठी जागेची आवश्यकता होती. त्यावेळी सहदेव केळजी यांनी ही गरज पूर्ण केली". आजही केळजी कुटुंबाची चौथी पिढी साळुंखे परिवाराला नि:स्वार्थीपणे सहकार्य करीत असल्याचे त्यांनी कृतज्ञतेने सांगितले.

“पूर्वीपेक्षा आता वाद्यकला शिकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाद्यांच्या मागणीतही वाढ झाली आहे. वादकांच्या गरजेनुसार वाद्य तयार करून देणे आणि त्यांच्या विश्वासाला पात्र ठरणे, हेच आमचे काम आहे. वर्षातून केवळ दोन ते अडीच महिने आम्ही वेंगुर्ल्यात असतो; मात्र येथील लोकांमध्ये मिळणारा आपलेपणा आणि जिव्हाळा यामुळेच आमचा हा प्रवास ५२ वर्षांपासून आजतागायत सुरू आहे,” असे आबा साळुंखे यांनी भावुक होत सांगितले.

दरम्यान, महादेव मेस्त्री यांनी साळुंखे परिवाराचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. वाद्यनिर्मिती आणि दुरुस्तीच्या माध्यमातून भजन, कीर्तन आणि पारंपरिक सांस्कृतिक कलेची सेवा करणाऱ्या साळुंखे परिवाराच्या ५२ वर्षांच्या योगदानाला वेंगुर्लावासीयांनी दिलेली ही आदराची पावती ठरली.

ruchira top