Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सिंधुदुर्गातील कुक्कुटपालन व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी शासन स्तरावर प्रभावी कार्यवाही

सिंधुदुर्गातील कुक्कुटपालन व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी शासन स्तरावर प्रभावी कार्यवाही


कुक्कुटपालन व्यावसायिकांना शासनाच्या योजना व सवलतींचा लाभ मिळवून द्या- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत कुक्कुटपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे. कुक्कुटपालन व्यवसायिकांना शासनाच्या विविध योजना, सवलती व सुविधांचा प्रभावी लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कृषी समकक्ष दर्जाच्या निर्णयाची प्रत्यक्ष आणि प्रभावी अंमलबजावणी करून कुक्कुटपालन व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी कुक्कुटपालन व्यवसायाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक आणि स्थानिक उद्योजकांना मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्या दृष्टीने या व्यवसायाला आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.

आज मंत्रालयात आयोजित कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या बैठकीत मंत्री श्री. राणे बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यावसायिक, संजय सावंत, योगेश बेळणेकर, श्रीपाद तवटे, सुनील धुरी, रमेश म्हाडगुत, प्रशांत म्हाडगुत आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सहभागी झाल्या.
कुक्कुटपालन व्यावसायिकांनी वीज जोडणीचा वापर व्यवसायाच्या स्वरूपानुसार करून घरगुती वीज जोडणीऐवजी व्यावसायिक वीज जोडणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कुक्कुटपालन व्यवसाय अधिक संघटित आणि सक्षम करण्यासाठी फार्मिंग कंपनी स्थापन करण्याबाबतही बैठकीत सूचना करण्यात आल्या.

ruchira top