Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

नवीन क्रीडा पोर्टलचा घोळ ,अखेर जुन्या साईटवर नोंदणी सुरू!

नवीन क्रीडा पोर्टलचा घोळ ,अखेर जुन्या साईटवर नोंदणी सुरू!

महासंघाच्या मागणीला यश; मात्र वाया गेलेला कालावधी भरून काढण्यासाठी घाईघाईने स्पर्धा उरकू नका ..
खेळाडूंच्या नुकसानीचा धोका टाळण्याची महासंघाची मागणी..

सिंधुदुर्ग :
नवीन क्रीडा पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे शाळा, क्रीडा शिक्षक आणि खेळाडूंची होणारी फरफट थांबविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने केलेल्या मागणीला अखेर यश आले असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी जुन्या संकेतस्थळावरून प्रवेशिका नोंदणी व खेळाडू रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे. मात्र, पोर्टलच्या घोळामुळे वाया गेलेला कालावधी भरून काढण्यासाठी आता घाईघाईने तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांचे नियोजन करून खेळाडूंची कसरत वाढवू नये, अशी ठाम भूमिका महासंघाने घेतली आहे.

यासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांची भेट घेऊन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, कार्याध्यक्ष विजय मागाडे, सारिका शिंदे आदी उपस्थित होते.

पोर्टलचा घोळ थांबला; आता स्पर्धांच्या नियोजनाचा घोळ नको!

नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाचा क्रीडा कालावधी मोठ्या प्रमाणात वाया गेला. महासंघाने याबाबत सातत्याने आवाज उठवत नवीन पोर्टल पूर्णपणे कार्यक्षम होईपर्यंत जुन्याच साईटवरून नोंदणी सुरू ठेवावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार क्रीडा कार्यालयाने जुन्या साईटवरून नोंदणी सुरू केल्याने शाळा व खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र, “ऑगस्ट गेला म्हणून आता सप्टेंबरमध्ये स्पर्धांचा धडाका लावून राहिलेला कालावधी भरून काढायचा”, अशी भूमिका घेणे खेळाडूंच्या हिताचे ठरणार नाही. गणेश चतुर्थी, घटकचाचणी परीक्षा, चित्रकला परीक्षा तसेच शालेय शैक्षणिक कामकाज यामुळे सप्टेंबर महिन्यातही शाळांवर मोठा ताण असणार आहे. त्यामुळे स्पर्धा उरकणे हा उद्देश नसून खेळाडूंना दर्जेदार व योग्य तयारीसाठी पुरेसा वेळ देणे हा उद्देश असला पाहिजे, अशी मागणी महासंघाने केली आहे.

घाईच्या नियोजनाचा फटका खेळाडूंना बसू नये!

तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांचे नियोजन करताना सर्व खेळांच्या एकविध क्रीडा संघटना, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि महासंघाला विश्वासात घेऊन जिल्हास्तरीय नियोजन सभा घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. केवळ वाया गेलेला कालावधी भरून काढण्यासाठी सलग स्पर्धा आयोजित केल्यास खेळाडूंना प्रवास, सराव, शालेय परीक्षा आणि स्पर्धा यांचा ताण सहन करावा लागू शकतो. परिणामी खेळाडूंची कामगिरी, शारीरिक क्षमता आणि राष्ट्रीय स्तरावरील तयारीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

“पोर्टलचा घोळ प्रशासनाने सोडवला; आता घाईच्या स्पर्धा नियोजनाचा फटका खेळाडूंना बसू देणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका महासंघाने मांडली.

राष्ट्रीय स्पर्धांच्या तारखांबाबतही फेरविचाराची मागणी

राष्ट्रीय स्पर्धांच्या तारखा जवळ आल्याने जिल्हास्तरीय स्पर्धा घाईघाईने उरकण्याऐवजी सिंधुदुर्गची भौगोलिक परिस्थिती, कोकणातील गणेशोत्सव, शालेय परीक्षा आणि उपलब्ध कालावधी यांचा विचार करून नियोजन करणे आवश्यक आहे.

त्यासाठी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे जिल्ह्याची वस्तुस्थिती मांडून आवश्यक असल्यास राष्ट्रीय स्पर्धांच्या वेळापत्रकात बदल करण्याची विनंती करावी, अशी मागणी महासंघाने केली.
क्रीडा कार्यालयाचा व्हॉट्सॲप ग्रुप शिक्षकांसाठी खुला करा

‘सिंधुदुर्ग स्पोर्ट्स’ व्हॉट्सॲप ग्रुप केवळ ॲडमिनपुरता मर्यादित न ठेवता क्रीडा शिक्षकांना त्यांच्या अडचणी, सूचना व समस्या मांडण्यासाठी खुला ठेवावा, अशी मागणीही करण्यात आली. ग्रुपवर कार्यक्रम टाकला म्हणजे जबाबदारी संपली असे समजू नये. एखादा महत्त्वाचा संदेश शाळा, क्रीडा शिक्षक किंवा प्रशिक्षकांच्या निदर्शनास न आल्याने एखाद्या खेळाडूचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल महासंघाने उपस्थित केला.

क्रीडा कार्यालयातील मनुष्यबळाचाही प्रश्न

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना इतर जिल्ह्यांतील कामकाजासाठी पाठविण्याऐवजी ज्या कार्यालयातून त्यांचा पगार निघतो, त्याच कार्यालयात त्यांच्याकडून काम करून घ्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

प्रश्न सुटले नाहीत तर आंदोलनाचा इशारा

क्रीडा क्षेत्रातील सर्व प्रश्न तातडीने सोडवून खेळाडूकेंद्री, नियोजनबद्ध आणि घाईगडबड नसलेले स्पर्धा वेळापत्रक तयार करावे, अशी महासंघाची मागणी आहे.

खेळाडूंचे वर्ष वाचवणे महत्त्वाचे,
कागदावर स्पर्धा उरकणे नव्हे!
नवीन पोर्टलचा घोळ संपला,
आता घिसाडघाईच्या स्पर्धा नियोजनाचा घोळ नको!


महासंघाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास सनदशीर मार्गाने आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला.

ruchira top