Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ..

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ..

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., बँकेच्या ६७ लिपिक पदांची भरती देशातील अग्रगण्य व मान्यताप्राप्त संस्था टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीमार्फत सुरू करण्यात आली असून, *गुरुवार दि. ३ सप्टेंबर, २०२६ रोजी दुपारी १२.०० वा. पासून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत गुरुवार दि. १७ सप्टेंबर, २०२६ रोजी रात्री २३.५९ वा. पर्यंत राहील.*

सदर भरती प्रक्रिया शासनाच्या नव्याने निर्धारित केलेल्या निवड निकषानुसार राबविण्यात येणार असून, एकूण पदांपैकी ७०% पदांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उर्वरित ३०% पदांसाठी जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवारांचा विचार करणेत येईल.

या परीक्षेसाठी उमेदवारांना *रु. ९००/- जीएसटीसहित* परीक्षा शुल्क भरणा करावे लागणार असून, परीक्षा शुल्काची रक्कम ऑफलाईन पेमेंट मोडद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथील खात्यावर भरणा करावयाची आहे. परीक्षा शुल्काची रक्कम सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कोणत्याही शाखेत कामकाजाच्या वेळेत (कार्यालयीन सुट्टी वगळून) सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.३० या वेळेत भरणा करता येईल.

सदरची रक्कम एनईएफटी/आयएमपीएस/अकौंट ट्रान्सफर द्वारे भरता येणार असून, ट्रान्झॅक्शन आयडी प्रवेश अर्जात नमूद करून काऊंटर पार्ट / पैसे भरल्याचा ट्रान्झॅक्शनचा फोटो/स्क्रीन शॉट अर्जात अपलोड करणे आवश्यक आहे. उमेदवाराला अर्ज भरताना अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) अपलोड करणे अनिवार्य असून, प्रस्तुत पदांकरीता केवळ बँकेच्या www.sindhudurgdcc.bank.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणा करणे आवश्यक आहे.

भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधारीत व संगणकीकृत पद्धतीने टीसीएस (TCS) कंपनी मार्फत राबविण्यात येणार असून, उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता व इतर माहिती अचूकपणे नमूद करावी. सदर भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती बँकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर अर्ज भरताना काही अडचण आल्यास टीसीएस (TCS) संस्थेच्या हेल्पलाईन नं. ७९९६१०४१११ वर संपर्क साधावयाचा आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीपूर्वी सादर करावेत असे आवाहन बँकेचे अध्यक्ष महोदय श्री. मनीष दळवी यांनी केले आहे.

ruchira top