१ सप्टेंबर रोजी मेढा मालवण येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
बुवा कु. अंकिता गावडे, बुवा राजेंद्र कोदे यांची होणार भजने
मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील काळबादेवी मंदिरात आई काळबादेवीची वार्षिक जत्रोत्सव मंगळवार, दि. १ सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. श्रावण वार्षिक जत्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जत्रोत्सवानिमित्त दुपारी ३ वाजता अष्टविनायक प्रासादिक महिला भजन मंडळ (साळेल), मालवण यांच्या वतीने संगीत भजनाचा कार्यक्रम होणार असून, बुवा कु. अंकिता गावडे यांचे सुस्वर भजन होणार आहे. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता श्रीदेवी सातारी प्रासादिक भजन मंडळ,कांदळगाव-देऊळवाडी बुवा राजेंद्र कोदे यांचे संगीत भजन होणार आहे.
या जत्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आई काळबादेवीचे दर्शन घ्यावे व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन धुरी कुटुंबीय परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.जत्रोत्सवाचा कार्यक्रम काळबादेवी मंदिर, मेढा, मालवण येथे होणार आहे.

श्री काळबादेवीचा वार्षिक श्रावण जत्रोत्सव....!
