Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सभापती प्रज्ञा चव्हाण व पदाधिकाऱ्यांकडून रक्षाबंधनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना राखी बांधून शुभेच्छा..

सभापती प्रज्ञा चव्हाण व पदाधिकाऱ्यांकडून रक्षाबंधनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना राखी बांधून शुभेच्छा..

शानू वालावलकर | मालवण : खासदार नारायण राणे साहेब, आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास गतिमान असून विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना आणि विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. रस्ते, पायाभूत सुविधा, ग्रामीण विकासासह सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा आणि गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. लाडक्या बहिणी, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी आणि तरुण यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून काम करणारे हे हक्काचे सरकार आहे, अशी भावना व्यक्त करत सौ. प्रज्ञा चव्हाण यांनी विकासाच्या या प्रवासाचे प्रतीक म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मनगटावर राखी बांधली.
रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधत मालवण पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण यांच्यासह पंचायत समिती सदस्य सौ. मानसी भोगावकर, सौ. योजना कांबळी, सौ. माधुरी मसुरकर आणि विभागप्रमुख मयुरी घाडीगावकर यांनी सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने झालेल्या या उपक्रमातून भगिनी-भावाच्या स्नेहासोबतच जनसेवा, विकास आणि सामाजिक बांधिलकीचे नाते अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दत्ता सामंत यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

ruchira top