आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन मधून 10 लाख निधी मंजूर
खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे शिवसेना शाखाप्रमुख समीर पाटकर यांनी मानले आभार
शानू वालावलकर | मालवण : मालवण तालुक्यातील नांदरुख कुर्लेभाटले येथे 63 केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर (निधी 10 लाख) जिल्हा नियोजन मधून प्रस्तावित करण्यात आला आहे.
नांदरुख कुर्लेभाटले येथे ट्रान्सफॉर्मर मुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन मधून ट्रांसफार्मर मंजूर झाले आहेत. याबाबत खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे शिवसेना शाखाप्रमुख समीर पाटकर यांनी आभार मानले आहेत.

नांदरुख कुर्लेभाटले येथे १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर मंजूर
