आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन मधून 24 लाख निधी मंजूर
खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी मानले आभार
शानू वालावलकर | मालवण : मालवण तालुक्यातील आडवली घाडीवाडी आडवली
येथे १०० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर (निधी 12 लाख) तसेच चिंदर गावठणवाडी येथे १०० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर (निधी 12 लाख) जिल्हा नियोजन मधून प्रस्तावित करण्यात आला आहे.
आडवली घाडीवाडी व चिंदर गावठणवाडी येथे ट्रान्सफॉर्मर मुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन मधून हे ट्रांसफार्मर मंजूर आहेत. याबाबत खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी आभार मानले आहेत.

आडवली, चिंदर येथे १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर मंजूर
