Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

जय गणेश इंग्लिश स्कूलमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना 'राखी बंध’

जय गणेश इंग्लिश स्कूलमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना 'राखी बंध’


विद्यार्थी-शिक्षकांकडून स्वच्छता दूतांचा सन्मान; सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश

राहुल जाधव | मालवण : रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरावा, या उद्देशाने मालवण येथील जय गणेश इंग्लिश स्कूलमध्ये आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. मालवण नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांनी राखी बांधून त्यांचा सन्मान केला. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सफाई कर्मचारी दररोज मेहनत घेत असतात. मात्र, त्यांच्या कार्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. कचऱ्याशी संबंधित काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अपमानास्पद शब्दांनी संबोधले जाण्याचे प्रकारही समाजात पाहायला मिळतात. प्रत्यक्षात हे कर्मचारी ‘कचऱ्यावाले' नसून आपल्या परिसराची स्वच्छता राखणारे, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे खरे‘स्वच्छता दूत’ आहेत.
हीच जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण व्हावी आणि सफाई कर्मचाऱ्यांप्रती आदराची भावना रुजावी, या उद्देशाने जय गणेश इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. तेजल वेंगुर्लेकर यांनी हा उपक्रम आयोजित केला. विद्यार्थ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्याप्रती असलेला सन्मान आणि आपुलकी व्यक्त केली.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘स्वच्छता दूतांचा सन्मान हीच खरी सामाजिक बांधिलकी’ असा सुंदर संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांना सामाजिक संवेदनशीलता, माणुसकी आणि प्रत्येकाच्या कार्याचा आदर करण्याची शिकवण देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला.

ruchira top