युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांच्याकडून आनंदाश्रय येथे अन्नदान व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
मालवण | प्रतिनिधी : वडिलांच्या स्मृती जपताना सामाजिक सेवाकार्याचा वसा युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी कायम जपला आहे. वडिलांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त अणाव-मयेकरवाडी येथील जीवन संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रय येथे अन्नदान तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून वडिलांच्या सेवाकार्याच्या आठवणींना उजाळा दिला.

कै. विलास सुरबा गावडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रीतम गावडे यांच्याकडून दरवर्षी सेवाकार्य आणि अन्नदानाचा उपक्रम राबविला जातो. वडिलांनी जपलेल्या माणुसकीच्या आणि सेवाभावाच्या मूल्यांची आठवण जपत हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्यात आला आहे.

यावर्षी कै. विलास गावडे यांच्या दहाव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत अणाव-मयेकरवाडी, कुडाळ येथील आनंदाश्रयमध्ये अन्नदान करण्यात आले. तसेच तेथील गरजूंसाठी विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त करण्यात येणारे हे सेवाकार्य प्रीतम गावडे यांच्यासाठी केवळ सामाजिक उपक्रम नसून, वडिलांनी दिलेल्या संस्कारांना वाहिलेली भावनिक आदरांजली आहे. ‘माणसाच्या आयुष्यातील खरी श्रीमंती ही इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यात आहे,’ हा विचार कृतीतून जपत त्यांनी वडिलांच्या स्मृतींना सामाजिक बांधिलकीतून अभिवादन केले.

यावेळी प्रीतम गावडे यांच्या आई प्रणाली गावडे, पत्नी वैष्णवी, बहीण प्रतीक्षा, तसेच ओंकार चव्हाण, प्रतीक गावडे, सुश्रुत गावडे आदी उपस्थित होते. कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमामुळे वडिलांच्या आठवणींना आणखी भावनिक स्पर्श लाभला.
▪️अमित खोत | मालवण

