Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

अनुभव शिक्षा केंद्र व गोपुरी आश्रमाच्या वतीने युवाईसाठी वक्तृत्व स्पर्धा २०२६ संपन्न

अनुभव शिक्षा केंद्र व गोपुरी आश्रमाच्या वतीने युवाईसाठी वक्तृत्व स्पर्धा २०२६ संपन्न

"स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोध नाही" - कवयित्री सरिता पवार

कणकवली :-
युवकांना विविध सामाजिक प्रश्नाबाबत सजगता यावी याकरिता अनुभव शिक्षा केंद्र व गोपुरी आश्रमाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘वक्तृत्व स्पर्धा- २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचार मंचावर गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, पर्यावरण अभ्यासिका मेगल डिसोजा आदी मान्यवर उपस्थित होते.


वक्तृत्व स्पर्धा अनुक्रमे -१) कोकण का तापतंय , २) महिला अत्याचार - दोष कुणाचा?, ३) युवकांचे भविष्य- सकारात्मक बदलाची गरज, ४) आजचे राजकारण आणि युवकांची भूमिका या विषयांवर आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत एकूण ३० युवा - युवतींनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये विठ्ठल संजय दळवी (वय वर्षे २५, इन्सुली) याने प्रथम क्रमांक पटकावला, प्रतीक्षा संजय पाटील (वय वर्षे १८ हरकुळ, बुद्रुक) हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला, अस्मि धनंजय करंगुटकर (वय वर्षे १६, न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला, तर आर्या सत्यवान जोईल (वय वर्षे १८, शा.कृ.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड) हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. पारितोषिकांचे प्रायोजकत्व अनुक्रमे सचिन कोरगावकर, गोपुरी आश्रम व ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्त्या कमलताई परुळेकर यांनी स्वीकारले होते.

"स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोध असा काहीसा विचार समाजमनावर पसरलेला दिसतो परंतु स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोध नसून स्त्रीवाद म्हणजे ‘मानवतावाद’ आहे. हा विचार युवक आणि आणि समाजाने समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्याची गरज आहे", असे कवयित्री सरिता पवार यांनी स्पर्धेच्या समारोपप्रसंगी प्रतिपादन केले.
सरिता पवार पुढे म्हणाल्या की, "आपण सातत्याने ऐतिहासिक पुराव्यांच्या संदर्भावर संशोधनाची मांडणी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु व्यक्तिगत पातळीवर नवीन उदाहरणांचा सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. युवकांच्यात ही सजगता येणे गरजेचे आहे".
गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ राजेंद्र मुंबरकर यांनी पुढील महिन्यापासून गोपुरी आश्रमात युवकांच्याकरिता ‘वाचन संस्कृती विकास’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले. हा उपक्रम प्रत्येक महिन्यात एका रविवारी आयोजित करण्यात येणार आहे. युवकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
गोपूरी आश्रमाचे सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी जिल्ह्याचे पर्यावरण शाश्वत ठेवण्यासाठी पुढील काळात जिल्ह्याच्या जैवविविधतेचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. या उपक्रमात युवा वर्गाने सहभाग घेऊन जिल्ह्याची जैवविविधता आबाधित राखण्याकरिता सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

या स्पर्धेच्या वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरील शरीरशौष्ट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या अमित कदम, तसेच साथी मेगल डिसोझा, राहुल जाधव, तन्मय पंडित, रोहित जाधव या युवकांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोपुरी आश्रमाचे सचिव बाळू मेस्त्री, खजिनदार विनायक सापळे, सहसचिव संदीप सावंत, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर यांच्यासाहित यज्ञेश पोकळे, सुदीप दिगवळेकर, राहुल कांबळे, श्रुती पाटणकर, बुशरा बागवान, सिद्धी परब, महेश जाधव, विद्देश बाईत, वनश्री जाधव व दुर्गेश पवार यांनी विशेष मेहनत घेतली.

ruchira top