Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

दिल्ली ऑल इंडिया थलसेना कॅप साठी सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभागाच्या सीनियर अंडर ऑफिसर रूपाली करंगुटकरची निवड

दिल्ली ऑल इंडिया थलसेना कॅप साठी सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभागाच्या सीनियर अंडर ऑफिसर रूपाली करंगुटकरची निवड


दिल्ली येथे होणाऱ्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प फायरिंग कॉम्पिटिशनसाठी महाराष्ट्र राज्याचे करणार प्रतिनिधित्व

मंगेश नलावडे | मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागातील सीनियर अंडर ऑफिसर रूपाली करंगुटकर हिची दिल्ली येथे 31 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणाऱ्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प – फायरिंग कॉम्पिटिशनसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. ही निवड महाविद्यालय, कृ. सी. देसाई शिक्षण संस्था तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरली आहे.
रूपाली करंगुटकर हिने आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या, शिस्तीच्या आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. गेल्या जून महिन्यापासून सुरू झालेल्या निवड प्रक्रियेत सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांमधून तिची सुरुवातीला निवड झाली. त्यानंतर 58 महाराष्ट्र बटालियन, ओरस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोल्हापूर येथे आयोजित विविध प्रशिक्षण व निवड शिबिरांमध्ये तिने सहभाग घेतला. प्रत्येक टप्प्यावर आपल्या कौशल्याची प्रभावी छाप पाडत तिने पुढील निवडीत स्थान मिळवले.
रूपालीच्या या यशामध्ये 58 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज, लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक तसेच बटालियनमधील इतर आर्मी ऑफिसर्स यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने विविध शिबिरांमध्ये कठोर प्रशिक्षण घेतले आणि फायरिंगसह NCC मधील विविध कौशल्यांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली.
त्याचबरोबर स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या NCC विभागाचे प्रमुख असोसिएट NCC ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांचेही रूपालीला सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयीन स्तरापासून विविध निवड चाचण्या, प्रशिक्षण शिबिरे आणि पुढील स्पर्धांसाठी त्यांनी तिच्या तयारीकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि रूपालीच्या अथक परिश्रमामुळे तिला प्रत्येक टप्प्यावर पुढे जाण्याची संधी मिळाली.
यानंतर रूपालीची अहमदनगर येथे आयोजित फायरिंग कॉम्पिटिशनसाठी निवड झाली. जून महिन्यापासून आतापर्यंत तिने तब्बल दहा-दहा दिवसांची सहा विविध शिबिरे पूर्ण केली आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक शिबिरानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत तिची सातत्याने पुढील टप्प्यासाठी निवड होत गेली. अखेर या कठोर प्रशिक्षण व निवड प्रक्रियेतून तिने राष्ट्रीय स्तरावर झेप घेत दिल्ली येथे होणाऱ्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प – फायरिंग कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळवला आहे.
महाराष्ट्रातून फायरिंग कॉम्पिटिशनसाठी रूपालीची निवड होणे ही महाविद्यालयाच्या दृष्टीने विशेष अभिमानाची बाब आहे. तिच्या या यशामुळे स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक मालवण तालुक्यातील विविध मान्यवर, नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींकडून होत आहे.
रूपालीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य के. के. राबते तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख असोसिएट NCC ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांनी तिचे अभिनंदन केले असून दिल्लीतील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच NCC विभागातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनीही रूपालीच्या यशाचे कौतुक करून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे, सहसेक्रेटरी संदेश कोयंडे, कोषाध्यक्ष नंदन देसाई, संचालक अॅड. समीर गवाणकर, डॉ. शशिकांत झांटये, डॉ. रामचंद्र काटकर, महादेव पाटकर, राजेंद्र खांडाळेकर, शैलेश पावसकर, माजी संचालक प्रमोद ओरसकर, भाऊ सामंत, विजय केनवडेकर तसेच संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी रूपालीचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांनीही रूपालीच्या या उल्लेखनीय यशाचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिद्द, शिस्त, सातत्यपूर्ण सराव, आर्मी ऑफिसर्सचे मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर रूपाली करंगुटकर हिने साडेतीन हजार विद्यार्थ्यांमधून सुरू झालेल्या निवड प्रक्रियेपासून राष्ट्रीय स्तरापर्यंतचा हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. तिच्या या यशामुळे मालवणच्या शैक्षणिक आणि NCC क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दिल्ली येथे होणाऱ्या फायरिंग कॉम्पिटिशनमध्ये ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष तिच्या कामगिरीकडे लागले आहे. रूपाली करंगुटकर हिला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

▪️अमित खोत | मालवण

ruchira top