‘श्रावणधारा’तून धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
१८ ऑगस्टपासून विविध धार्मिक कार्यक्रम सोबत भजनसेवा व दशावतारी नाट्यप्रयोग
घुमडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पुढाकाराने घुमडे ग्रामस्थ मंडळ यांचे आयोजन
शानू वालावलकर | मालवण : घुमडे-मालवण येथील घुमडाई मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्याचे औचित्य साधून ‘श्रावणधारा’ या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घुमडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक विधी, लघुरुद्र, महाप्रसाद, निमंत्रित बुवांची भजनसेवा तसेच नामवंत दशावतारी नाट्य मंडळांचे प्रयोग अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी भाविक व रसिकांना मिळणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व शिवसेना जिल्हा प्रमुख मा. श्री. देवदत्त (दत्ता) सामंत यांच्या पुरस्कृत, तसेच घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन भजन महर्षी कै. पंढरीनाथ घाडीगावकर बुवा यांच्या स्मरणार्थ करण्यात आले आहे.
१८ ऑगस्टला लघुरुद्र, महाप्रसाद व ‘किमिच्छक व्रत’
महोत्सवाची सुरुवात मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. सकाळी ९ वाजता धार्मिक कार्यक्रम व लघुरुद्र, दुपारी १ वाजता महाप्रसाद, तर सायंकाळी ७ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचा ‘किमिच्छक व्रत’ हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
गुरुवार, २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता निमंत्रित बुवांची भजनसेवा आयोजित करण्यात आली आहे.
२५ ऑगस्टला ‘दुर्गाशष्ठी’चा प्रयोग
मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ वाजता महाप्रसाद आणि सायंकाळी ७ वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांचा कार्यक्रम होणार आहे. कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत 'दुर्गाशष्ठी' हा दशावतारी नाट्यप्रयोग यावेळी सादर केला जाणार आहे.
गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता निमंत्रित बुवांची भजनसेवा होणार आहे.
१ सप्टेंबरला ‘कृष्ण !! ब्रह्मांडाचा धनी’
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ वाजता महाप्रसाद आणि सायंकाळी ७ वाजता चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, मालवण यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. देवेंद्र नाईक प्रस्तुत ‘कृष्ण !! ब्रह्मांडाचा धनी’ हा नाट्यप्रयोग रसिकांना पाहता येणार आहे.
गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता निमंत्रित बुवांची भजनसेवा आयोजित करण्यात आली आहे.
८ सप्टेंबरला ‘इंद्रजित वध’ने सांगता
महोत्सवातील अंतिम कार्यक्रम मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असून, सकाळी ९ वाजता विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ वाजता महाप्रसाद आणि सायंकाळी ७ वाजता हेरंब दशावतार नाट्य मंडळ, मालवण यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. पप्पू नांदेसकर प्रस्तुत ‘इंद्रजित वध’ हा प्रयोग यावेळी रंगणार आहे.
श्रावण महिन्यातील या ‘श्रावणधारा’ कार्यक्रमातून धार्मिक वातावरणासोबतच कोकणातील पारंपरिक दशावतारी कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. विविध धार्मिक विधी, भजनसेवा, महाप्रसाद आणि दशावतारी नाट्यप्रयोगांचा लाभ भाविक व रसिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री. दत्ता सामंत, अध्यक्ष, घुमडे ग्रामस्थ मंडळ, घुमडे-मालवण यांनी केले आहे.
▪️अमित खोत | मालवण

