Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

रील बनवा अन् २५ हजारांचे बक्षीस जिंका!

रील बनवा अन् २५ हजारांचे बक्षीस जिंका!

मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत सिंधुदुर्गातील युवकांनी सहभागी व्हावे

सिंधुदुर्गनगरी, दि. १७ (जिमाका) : माती आणि पाण्याच्या संवर्धनावर भन्नाट रील बनवा आणि जिल्हास्तरावर २५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक जिंका! मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताहादरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांत ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेच्या माध्यमातून Instagram च्या माध्यमातून मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


स्पर्धेसाठी सहभागी युवकांनी ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करून ती स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, सहभागीचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक असून, मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे तसेच #SaveSoilSaveWater हा अधिकृत हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे. माती संवर्धन, पाणी बचत, मातीची धूप रोखणे, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी जलसंधारण कामे, पारंपरिक पद्धती आणि माती-पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना आदी विषयांवर रील तयार करता येणार आहे. ‘एक Reel… मातीसाठी! एक Reel… पाण्यासाठी! एक Reel… सुरक्षित भविष्यासाठी!’ हा या अभियानाचा मुख्य संदेश आहे.

रील्सचे परीक्षण विषय व संदेश – ३० गुण, कल्पकता – २५, प्रभावी सामाजिक संदेश – २०, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता – १५ आणि Instagram Engagement – १०, अशा एकूण १०० गुणांवर करण्यात येणार आहे. केवळ Likes किंवा Followersच्या आधारे विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media Engagement यांचा समतोल साधून विजेत्यांची निवड केली जाणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये व गौरवचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये व गौरवचिन्ह आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व गौरवचिन्ह देण्यात येणार असून पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजेत्यांचा ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून विशेष गौरव करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांनी आपल्या कल्पकतेला डिजिटल व्यासपीठ देत जास्तीत जास्त रील्स तयार करून या जनजागृती अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

#SaveSoilSaveWater #MahaWalkathon #WalkForWater

https://www.instagram.com/mahawalkathon2026/#

ruchira top