Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गात ‘जहाजबांधणी’ची मुहूर्तमेढ!

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गात ‘जहाजबांधणी’ची मुहूर्तमेढ!

तळवणे येथे झोया मरीनच्या भव्य प्रकल्पाचे १५ ऑगस्टला भूमिपूजन

माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थिती होणार सोहळा

सावंतवाडी :-
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या 'झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे शनिवार, १५ ऑगस्ट रोजी दुपारी ठीक ३ वाजता हा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली तर माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे आणि कोकणाच्या औद्योगिक प्रगतीला अधिक बळ देणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या शुभ संकल्पनेतूनच तळवणे येथे या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे.

या विशेष सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर,सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती श्रीम. सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक आणि तळवणे ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद केरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने या ऐतिहासिक आणि औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व नागरिक व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ruchira top