Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सिंधुदुर्ग बँकेच्या कॉलसाठी अधिकृत क्रमांक निश्चित..

ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सिंधुदुर्ग बँकेच्या कॉलसाठी अधिकृत क्रमांक निश्चित..

मार्केटिंगसाठी बँकेच्या 1409345238 सर्विस व सेवा कॉल्स साठी 1600312838 क्रमांकावरूनच संपर्क

अनधिकृत कॉलपासून सावध राहण्याचे बँकेचे आवाहन

सिंधुदुर्ग :
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्वांनुसार ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध प्रकारच्या दूरध्वनी संपर्कासाठी अधिकृत क्रमांक निश्चित केले आहेत, अशी माहिती बँक प्रशासनाने दिली.

मार्केटिंग व प्रचारासाठी स्वतंत्र क्रमांक

बँकेच्या योजना, नवीन उत्पादने, ऑफर्स तसेच प्रचारात्मक संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी *1409345238* हा बँकेचा अधिकृत क्रमांक वापरण्यात येणार आहे. बँकेच्या मार्केटिंग विभागामार्फत या क्रमांकावरूनच ग्राहकांना कॉल करण्यात येतील. त्यामुळे योजनांबाबतची माहिती याच अधिकृत क्रमांकावरून दिली जाईल.

सेवा व कर्जवसुलीसाठी स्वतंत्र क्रमांक

ग्राहक सेवा व कर्जवसुलीसंदर्भातील कॉलसाठी 1600312838 हा बँकेचा अधिकृत क्रमांक निश्चित करण्यात आला आहे. कर्जवसुलीच्या प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना त्यांच्या थकीत रकमेची माहिती, परतफेडीचे पर्याय तसेच बँकेचे दैनंदिन कामकाजा संदर्भात उदाहरणार्थ KYC, Dormant Reactive इत्यादी बाबतीत ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी या क्रमांकाचा वापर केला जाणार आहे. हे कॉल AI तसेच Dialer मार्फत करण्यात येतात.

बँकेचे आवाहन

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि बँकेशी संबंधित संवाद अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हे अधिकृत क्रमांक निश्चित करण्यात आले आहेत. ग्राहकांनी बँकेच्या नावाने येणाऱ्या अनधिकृत किंवा संशयास्पद कॉल्सपासून सावध राहावे आणि बँकेशी संबंधित कॉलची खातरजमा करण्यासाठी वरील अधिकृत क्रमांकांची नोंद ठेवावी, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.

ruchira top