राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघ शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार
राजापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राजापूर-लांजा- साखरपा २६७ विधानसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. किरण (भैया) रवींद्र सामंत यांचा उमेदवारी अर्ज बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करून दाखल करण्यात आला. यावेळी बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महायुतीची राजापूर येथील जवाहर चौक येथे सभा पार पडली.

जनसामान्य आणि कार्यकर्त्यांचा आशीर्वाद घेऊन किरण सामंत यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज भरून जनसामान्यांच्या सेवेसाठी तत्पर असेन असे आश्वासन दिले.

याप्रसंगी, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग निरीक्षक रवींद्र फाटक, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आंग्रे व महायुतीचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



