वॉर्ड बॉय, मावशी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व रिसेप्शनिस्ट पदांसाठी भरती
इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन
मालवण | प्रतिनिधी : मालवण रेवतळे येथील झांट्ये हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या वतीने पात्र व इच्छुक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, संबंधित पदांसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
झांट्ये हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय, मावशी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन आणि रिसेप्शनिस्ट या पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. स्टाफ नर्स पदासाठी ANM, GNM तसेच B.Sc. Nursing पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.
आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या तसेच संबंधित कामाचा अनुभव किंवा आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही रोजगाराची चांगली संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी विलंब न करता रुग्णालयाशी संपर्क साधून वॉक-इन इंटरव्ह्यूबाबत अधिक माहिती घ्यावी.
संपर्क : डॉ. शिल्पा झांट्ये
📞 9421234760 | 8080558616 | 9422393929
📍 पत्ता : झांट्ये हॉस्पिटल, रेवतळे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन झांट्ये हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

झांट्ये हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी वॉक-इन इंटरव्ह्यू..
