सावंतवाडी शहरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ‘भव्य तिरंगा यात्रा’
पालकमंत्री नितेश राणे तिरंगा यात्रेचा शुभारंभ करून यात्रेत सहभागी ; जनतेचा उत्स्फूर्त सहभाग
सावंतवाडी | प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १० ते १७ ऑगस्ट या कालावधीत देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला जनसहभागाची जोड देण्यासाठी आज सोमवारी सावंतवाडी शहरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ‘भव्य तिरंगा यात्रा’ आयोजित करण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे यांनी या तिरंगा यात्रेचा शुभारंभ करून यात्रेत सहभागी झालो. हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने सावंतवाडी शहराचा परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.


यावेळी आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, तिरंगा यात्रा अभियान प्रमुख संदीप गावडे, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, युवराज लखम राजे भोंसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, विशाल परब, विक्रांत सावंत, सुदन कवठणकर, मायकल डिसोजा, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजप शहराध्यक्ष तथा नगरपरिषद सभापती सुधीर आडीवरेकर, महिला शहराध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर यांच्यासह अन्य नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


