Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

घराला भीषण आग | वायरी लुडबेवाडा येथील घटना

घराला भीषण आग | वायरी लुडबेवाडा येथील घटना

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

नागरिकांसह नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या तत्परतेने आग नियंत्रणात 

राहुल जाधव | मालवण | प्रतिनिधी : वायरी लुडबेवाडा, मालवण येथे रात्रीच्या सुमारास एका घराला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे कारण प्राथमिकदृष्ट्या शॉर्टसर्किट असल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि घरातील सर्व व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

आग लागली ते घर भगवान अनंत लुडबे यांचे असून उमा लुडबे आई, बहीण आरती रवींद्र गावकर या त्या ठिकाणी राहात होत्या.

आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी मालवण नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांच्या सह अग्निशमन विभागाचे वैभव वळंजू, सुमित हसोलकर, बाळकृष्ण जाधव, विरेश वळंजू, नितीन शिरसेकर बंबासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन पथकाने तातडीने आग विझविण्याचे काम हाती घेतले. स्थानिक नागरिकांनीही अग्निशमन कर्मचाऱ्यांना मोठी मदत केली. नागरिक आणि अग्निशमन विभागाच्या संयुक्त प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

नागरिक व नगरपरिषद अग्निशमन यंत्रणेच्या तत्परतेमुळे आग नियंत्रणात 

आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी घरातील व्यक्तींना बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात आल्याने परिसरातील इतर घरांनाही धोका निर्माण झाला नाही.

घटनास्थळी नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, मोहन वराडकर, नगरसेवक तपस्वी मयेकर, नारायण लुडबे, बाबल लुडबे, चेतन लुडबे, भाई लुडबे, अमर ढोलम, वैभव लुडबे, गणेश लुडबे, राजा लुडबे, कांता लुडबे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

अग्निशमन विभागाची तत्परता आणि स्थानिक नागरिकांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

ruchira top