Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १५६९ शेतकऱ्यांना ७.७७ कोटी रुपयांची कर्जमाफी, पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग...

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १५६९ शेतकऱ्यांना ७.७७ कोटी रुपयांची कर्जमाफी, पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग...

पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तांत्रिक अडचणी येणाऱ्या शेतकऱ्यांबाबत विशेष बाब म्हणून सवलत देण्याची मागणी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आज पहिल्या टप्प्यात १५६९ शेतकऱ्यांना ७ कोटी ७७ लाख ९८ हजार ६४४ रुपयांची कर्जमाफी मिळाली. याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहेत. मंत्रालय स्तरावर मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच जिल्ह्यातील या योजनेंतर्गत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विनंती केली.


आतापर्यंत अपलोड केलेल्या ६४९९ शेतकऱ्यांपैकी पात्र ३७०८ शेतकऱ्यांपैकी २२९५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले, पैकी १५६९ जणांना आज लाभ मिळाला. उर्वरीत शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यावर पुढील काळात कर्जमाफी देण्यात येणार आहे.या कर्जमुक्ती योजने अंतर्गत १६९ शेतकरी मयत, ३३९ खातेधारक देवस्थान /कबुलायतदार प्रकरणांतील, २१५ शेतकरी संमतीपत्रने वाटप तर इतर विविध कारणांमुळे २४ शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणांमुळे एकूण ७४७ शेतकऱ्यांच्या ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या असून त्यांच्यासाठी शासनाने विशेष सवलत व अटी शिथिल करण्याची गरज असल्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी केली. यासह फार्मर आइडी काढताना येणाऱ्या अडचणी, खावटी कर्ज पुरवठा बाबत देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत त्यांना लाभ मिळावा अशी विनंती केली.


याशिवाय जिल्ह्यातील २३० कर्जधारकांच्या आधार प्रमाणीकरणासाठी आवश्यक असलेले आधार ऑथेंटिकेशन प्रलंबित आहे. या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये, यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष मागणी केली आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक व आर्थिक परिस्थितीचा विचार करून या प्रलंबित व तांत्रिक अडचणीतील प्रकरणांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

आज राज्यस्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील
६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांना ५,०२९ कोटीं रुपयांचा लाभ वितरण करण्यात आला या कार्यक्रमात ते बोलत होते.

ruchira top