Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मठबुद्रुक आरोग्य उपकेंद्राला विनायक बाईत यांच्या वतीने इन्व्हर्टर भेट..

मठबुद्रुक आरोग्य उपकेंद्राला विनायक बाईत यांच्या वतीने इन्व्हर्टर भेट..

आरोग्य सेवेत अखंडित वीजपुरवठ्याच्या दृष्टीने सेवाभावी उपक्रम

शानू वालावलकर | मालवण प्रतिनिधी : 
शिवसेना मालवण तालुकाप्रमुख तथा उद्योजक विनायक बाईत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत जनसेवेचा आदर्श घालून दिला.

पाणलोस, मठबुद्रुक, निरोम, बुधवळे व कुडोपी परिसरातील जनतेच्या आरोग्य सेवेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या मठबुद्रुक उपकेंद्राला स्वखर्चातून इन्व्हर्टर भेट देऊन आरोग्य सेवेत अखंडित वीजपुरवठ्याची महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिली.

याचबरोबर मठबुद्रुक गावातील सर्व शाळा, गोठणे-सडेवाडी-बुधवळे शाळा तसेच श्रावण गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, केक व खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत वाढदिवस उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.


यावेळी तालुकाप्रमुख विनायक बाईत यांसह मठबुद्रुकचे माजी उपसरपंच निलेश बाईत, सरपंच बाळा वेंगुर्लेकर, श्रावणचे माजी सरपंच तथा विभागप्रमुख प्रशांत परब, गोठणेचे माजी सरपंच बाबू परब, माजी सरपंच विजय घाडी, ग्रामपंचायत सदस्य उदय सावंत, ज्येष्ठ नेते प्रमोद कदम, मंगेश बागवे, बाळा बागवे, कृष्णा बाईत, श्रावण गावचे सुपुत्र स्वप्निल दळवी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मंगेश यादव, तेजस श्रावणकर, छोटू घाडी, उमेश घाडीगावकर, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवक नाटेकर, मठबुद्रुक परिसरातील तिन्ही गावांच्या आशा सेविका, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. संवादे, आरोग्य सेविका आणि आरोग्य कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.

समाजसेवा, शिक्षणाला प्रोत्साहन आणि आरोग्य सुविधांचा विकास या तिन्ही क्षेत्रांना स्पर्श करणारे सामाजिक उपक्रम राबवत विनायक बाईत यांनी वाढदिवस हा समाजाप्रती कर्तव्याची जाणीव जपणारा प्रेरणादायी दिवस ठरला. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top