Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

'एक दिवस शेतकऱ्यासाठी, आपल्या अन्नदात्यासाठी’ ; १ ऑगस्ट रोजी तेरसेबांबर्डे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम

'एक दिवस शेतकऱ्यासाठी, आपल्या अन्नदात्यासाठी’ ; १ ऑगस्ट रोजी तेरसेबांबर्डे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम


‘बांधावरची शाळा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळणार शेतीचा प्रत्यक्ष अनुभव

सिंधुदुर्ग : विद्यार्थ्यांच्या मनात शेतकरी अर्थात बळीराजाबद्दल आदर निर्माण व्हावा, शेतीची आवड निर्माण होऊन तिचे महत्त्व समजावे, तसेच श्रमप्रतिष्ठा वाढावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेमार्फत ‘बांधावरची शाळा – एक दिवस शेतकऱ्यासाठी, आपल्या अन्नदात्यासाठी’ हा अभिनव उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ १ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता जि.प. पू. प्रा. केंद्रशाळा तेरसेबांबर्डे नं. १, ता. कुडाळ येथे होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हास्तरीय पदाधिकारी व अधिकारी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर सर्व तालुक्यांच्या ठिकाणीही तालुकास्तरीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना शेतीची केवळ पुस्तकी माहिती न देता प्रत्यक्ष शेताच्या बांधावर नेऊन शेतीचा अनुभव देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये शेतीचे गणित, शेतीतील विविध तंत्रे, बी-बियाणे, खते, कीटकनाशके, आधुनिक कृषी अवजारे यांची विद्यार्थ्यांना माहिती करून दिली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांचे योगदान आणि शेतीतील प्रत्यक्ष कामकाज समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

‘शेतकरी हा आपल्या अन्नाचा दाता आहे’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासोबतच शेतीविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, श्रमाचे महत्त्व पटवून देणे आणि कृषी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ अधिक घट्ट करणे, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, पालक, शेतकरी आणि नागरिक यांच्यात संवाद व सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. प्रत्येक गावातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी शाळेच्या संयोजनाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शेती व शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त करावा आणि त्यांच्या कष्टांचे कौतुक करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

ruchira top