कुडाळ शिवसेना उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक, रश्मी नाईक यांच्या पुढाकारातून आयोजन
शानू वालावलकर | कुडाळ : कुडाळ चेंदवण शिवसेना यांच्या पुढाकाराने व कुडाळ शिवसेना उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक, राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्षा कुडाळ आगर रश्मी देवेंद्र नाईक यांच्या सहकार्याने रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत श्री ऑनलाईन सर्व्हिस, चेंदवण, टेबवाडी येथे एनसीएमसी (NCMC) कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला व ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बस प्रवासातील विविध सुविधांचा लाभ मिळावा, तसेच सुलभ, सुरक्षित व कॅशलेस प्रवासासाठी आवश्यक असलेल्या NCMC (National Common Mobility Card) कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांची NCMC कार्ड नोंदणी करण्यात येणार असून, एस.टी. बस प्रवासात सवलतीचा लाभ, डिजिटल व कॅशलेस व्यवहार तसेच सोयीस्कर प्रवासासाठी हे कार्ड उपयुक्त ठरणार आहे.
नोंदणीसाठी आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक असून,नोंदणी शुल्क ₹२०० निश्चित करण्यात आले आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना उप तालुका प्रमुख देवेंद्र नाईक आणि कुडाळ आगर राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्षा रश्मी नाईक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

