गुरुपूजन, रामराज्यासाठी जप व स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचा समावेश
‘रामराज्य अर्थात हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि दिशा ’ या विषयावर होणार व्याख्यान ;नागरिकांननी उपस्थित राहण्याचे आवाहन
मालवण | प्रतिनिधी : गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।। सनातन संस्था यांच्या वतीने आषाढ गुरु पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात विविध आध्यात्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता दैवज्ञ भवन, मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे होणार आहे.
महोत्सवात गुरुपूजन, रामराज्यासाठी सामूहिक जप तसेच स्वसंरक्षण प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. याशिवाय ‘रामराज्य अर्थात हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि दिशा’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, उपस्थितांना या विषयाविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यक्रमास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच समाजात अध्यात्मप्रसाराचे कार्य करणाऱ्या सनातन संस्थेच्या कार्याला दानरूपाने सहकार्य करून या उपक्रमात सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठो मो. ७५८८५६९४३३ यावर संपर्क साधवा. असेही आवाहन करण्यात आले आहे.
▪️अमित खोत, मालवण

सनातन संस्थेच्या वतीने मालवणात आज गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन
