मालवण | प्रतिनिधी :
अपघातात जखमी झालेल्या मालवण तालुक्यातील राठीवडे येथील ज्येष्ठ दशावतारी कलाकार भास्कर मेस्त्री व सत्यवान मेस्त्री यांना पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ, सिंधुदुर्ग मालवण यांच्या वतीने आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात भास्कर मेस्त्री व सत्यवान मेस्त्री हे जखमी झाले होते. त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी मालवण तालुक्यातील दशावतारी कलाकारांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदत गोळा केली. कलाकारांच्या सहकार्याने एकूण ₹१७,२५० इतकी रक्कम जमा झाली असून ती मेस्त्री कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर,उपाध्यक्ष ओमप्रकाश चव्हाण,सचिव विनायक येरागी,सहसचिव विनोद परब,सल्लागार चंद्रकांत खोत,खजिनदार नितीन घाडीगावकर,यांच्यासह ज्येष्ठ दशावतारी कलाकार, बाळा मेस्त्री, बाबाजी मेस्त्री, चंद्रकांत चव्हाण, सचिन हडकर, आनंद हडकर, शशांक गावठे, वैभव वराडकर, विश्राम घाडी, शेखर गावंकर, सिद्धार्थ कोजरेकर, शैलेश घाडी, देवेंद्र परब, रुपेश चौकेकर, गिरिधर गावकर, अनिकेत गुळेकर, यशवंत मांजरेकर, विराज माळगावंकर, भास्कर मुसळे, पांडू सावंत, श्रेयश खोत, दिनेश राऊळ, आनंद तांबे, पवन वालावलकर, संजय सावंत, बापू (पप्पू) घाडीगावंकर, योगेश (बबलू) मेस्त्री, शमित मेस्त्री, पांडुरंग (पोलीस पाटील) तांडेल, अनिकेत पांजरी, सदानंद कांबळी, समीर परब, आनंद गावकर, तुकाराम गावडे यांसह अन्य दशावतारी कलाकार उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी अपघातग्रस्त कलाकारांना लवकरात लवकर पूर्ण बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करत, कलाकारांच्या अडचणीच्या काळात संपूर्ण दशावतार परिवार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची भावना व्यक्त केली. याबाबत माहिती सचिव विनायक येरागी यांनी दिली.
▪️अमित खोत | मालवण

अपघातग्रस्त दशावतारी कलाकार भास्कर मेस्त्री व सत्यवान मेस्त्री यांना पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाकडून आर्थिक मदतीचा हात
