Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

रेवंडी भेरेवाडी तिठा येथे भीषण अपघात

रेवंडी भेरेवाडी तिठा येथे भीषण अपघात


डंपरचे चाक पायावरून गेल्याने युवक गंभीर जखमी : अनधिकृत वाळू वाहतूक प्रश्नी ग्रामस्थांचा संताप


मंगेश नलावडे | मालवण  प्रतिनिधी :
मालवण आचरा मार्गांवर रेवंडी-भेरेवाडी तिठ्यावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात कोळंब खालचीवाडी येथील कुणाल महादेव पराडकर (२९) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याच्या पायावरून डंपरचे चाक गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुणाल याला तातडीने ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले असून अधिक उपचारासाठी खाजगी रूग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी रूग्णालय परिसरात कोळंब ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, (एमएच ०७ एपी-५२७८) क्रमांकाच्या अॅक्टिव्हावरून कुणाल पराडकर हा कोळंब येथून आचराच्या दिशेने जात होता. रेवंडी रोडवरून बाहेर येत असताना समोरून येणाऱ्या (जीए-०९ एल-४९६६) क्रमांकाच्या डंपरची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेनंतर युवक रस्त्यावर कोसळला आणि डंपरचे चाक त्याच्या पायावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. डंपरखाली अडकलेल्या युवकाला रोहन आचरेकर, सिद्धेश कोजरेकर यांनी बाहेर काढले. त्यांच्या धाडसामुळे जखमी युवकाला तातडीने उपचारासाठी हलविणे शक्य झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप, ऋषाली पाटील, सुहास पांचाळ, जनार्दन रेवंडकर, अजय येरम आदी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, डंपर चालक प्रशांत नागप्पा बिरालदनी (विजापूर) याच्याविरोधात संतप्त ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. अपघाताची माहिती समजताच कोळंब, कांदळगाव, रेवंडी तसेच परिसरातील शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. संतप्त नागरिकांनी बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून तातडीने कारवाई करण्यास सुरूवात करण्यात आली. महसूल विभागानेही दंडात्मक कारवाई करण्याच्या हाललाची सुरू केल्या होत्या. पोलीसांनी डंपर चालक व डंपर पोलीस स्थानक परिसरात नेला.
यावेळी घटनास्थळी संदीप शेलटकर, पंचायत समिती सदस्या योजना कांबळी,जगन्नाथ कोयंडे,संतोष शेलटकर,आबु नेरकर,गणेश आचरेकर,वैभव मेथर, रुपेश आंगणे, किशोर कांदळगांवकर,वासुदेव पराडकर, महादेव पराडकर(वडील), परेश पराडकर,अंकुश शेलटकर,आदी रेवंडी, कोळंब, सर्जेकोट,कांदळगाव, येथील ग्रामस्थ मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ruchira top