Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

दिव्यांग भगिनीला व्हीलचेअर प्रदान ;सामाजिक बांधिलकीचा सेवाभावी उपक्रम

दिव्यांग भगिनीला व्हीलचेअर प्रदान ;सामाजिक बांधिलकीचा सेवाभावी उपक्रम


उभादांडा : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साईकृपा दिव्यांग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र, ओरस यांच्या वतीने उभादांडा येथील कल्पना एकनाथ बांबार्डेकर या दिव्यांग भगिनीला व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.

उभादांडा शाळा क्रमांक २ परिसरात राहणाऱ्या कल्पना बांबार्डेकर यांना दैनंदिन हालचाली करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यांची गरज ओळखून संस्थेने त्यांना व्हीलचेअर उपलब्ध करून देत सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला. संस्थेचे प्रतिनिधी अनिल शिंगाडे यांच्या हस्ते व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आली.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, सुनील कांबळी, हर्षद खरात, सेजल तोरसकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच अशा उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांना नवे बळ, आत्मविश्वास आणि समाजातील आपलेपणाची जाणीव मिळते, असे मत व्यक्त केले.

व्हीलचेअर मिळाल्याने कल्पना बांबार्डेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत संस्था व सहकार्य करणाऱ्या सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले. दिव्यांगांच्या गरजा ओळखून त्यांना आवश्यक सहाय्य पुरविण्याचे कार्य साईकृपा दिव्यांग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत सातत्याने सुरू असून, भविष्यातही असे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ruchira top