Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट डे' उत्साहात....

रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट डे' उत्साहात....

रानभाज्यांच्या मांडणी व विक्रीतून विद्यार्थ्यांसाठी 'आनंददायी शनिवार' साजरा

व्यवसाय विषयक व्यवस्थापनाचा अनुभव

मालवण : मालवण शहरातील रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये १८ जुलै २०२६ रोजी 'मार्केट डे' उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार साजरा करण्याच्या उद्देशाने रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण येथे 'मार्केट डे' हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोज़ा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच प्रशालेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या सहयोगाने या 'मार्केट डे' उपक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी रानभाज्यांची विक्री करून प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभव घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याने विक्रेता आणि ग्राहक अशा जबाबदारी व भूमिका प्रत्यक्ष जाणून घेतल्या. रानभाज्यांची मांडणी, ग्राहकांशी संवाद, विक्री आणि पैशांचे व्यवस्थापन अशा विविध बाबींचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून मिळाला.

हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, ज्ञानवर्धक, प्रोत्साहक आणि प्रेरणादायी ठरला असे विद्यार्थी विद्यार्थिनींनी सांगितले.

उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कार्यव्यग्रतेचा आनंद, काम करण्याची जिद्द, चिकाटी, संयम, आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांचा अनुभव आविष्कार पाहायला मिळाला आणि अशा अनुभवात्मक शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, संवादकौशल्य, आर्थिक साक्षरता आणि उद्योजकतेची बीजे रुजण्यास निश्चितच मदत होणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

उपक्रमाला पालक वर्गाने केलेले सहकार्य दिलेला पाठिंबा आणि प्रतिसादाबद्दल रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांनी विशेष कृतज्ञापर समाधान व्यक्त केले आहे.

ruchira top