Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कर्मचारी एकजुटीचा विजय!

कर्मचारी एकजुटीचा विजय!


पालकमंत्री नितेश राणे यांच्या मध्यस्थीने आंदोलनाला यश; प्रांताधिकाऱ्यांच्या बदलीची ग्वाही, आंदोलन स्थगित

कणकवली | प्रतिनिधी : देवगड येथे बीएलओ प्रशिक्षणादरम्यान कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी कर्मचाऱ्यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी समन्वय समिती, सिंधुदुर्गच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील तब्बल २६ कर्मचारी संघटना एकवटल्या. या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाशी कणकवली येथे सविस्तर चर्चा केली. सकारात्मक तोडगा निघाल्याने आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली.

बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "कर्मचाऱ्यांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा नाही. अशा अधिकाऱ्यांची लवकरच उचलबांगडी होईल. हा माझा शब्द आहे."

ते पुढे म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचारी आणि जनता हे माझे कुटुंब आहे. कर्मचाऱ्यांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. उद्धटपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही."

यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर, राज्यनेते सखाराम सकपाळ, सचिव सत्यवान माळवे, नरसू रेडकर, वामन तर्फे, दिनेश म्हाडगुत, सुहास सावंत, संदीप कदम, राजू वजराटकर, जगदीश गोगटे, जयेंद्र चव्हाण, सचिन मदने, संदीप मिराशी, निकिता ठाकूर, सोमनाथ शेंगाळ, लक्ष्मण वळवी, सुशांत मर्गज, निलेश ठाकूर, टोनी म्हापसेकर, हनुमंत वाळके, सुभाष गावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

'असा प्रकार पुन्हा घडल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा'

पालकमंत्री नितेश राणे यांनी कर्मचारी संघटनांना आश्वस्त करत सांगितले की, भविष्यात कोणत्याही अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यांचा अवमान झाल्यास कर्मचारी समन्वय समितीने थेट माझ्याशी संपर्क साधावा. "मला कोणत्याही अधिकाऱ्यापेक्षा कर्मचारी अधिक महत्त्वाचे आहेत," असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या बदलीसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

तसेच, बीएलओ व एसआयआर हे राष्ट्रीय महत्त्वाचे काम असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करून ही कामे मुदतीत पूर्ण करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्र्यांनी दिलेल्या ठोस आश्वासनांवर समाधान व्यक्त करत समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर सर्व कर्मचारी बीएलओ व एसआयआरची कामे नियमितपणे पार पाडतील, असेही जाहीर करण्यात आले.

एकजुटीने मिळवला न्याय

या संपूर्ण प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचारी संघटनांनी दाखविलेली अभूतपूर्व एकजूट हेच आंदोलनाच्या यशाचे प्रमुख कारण असल्याची भावना समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, राज्यभरातील कर्मचारी संघटना तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व २६ कर्मचारी संघटना आणि कर्मचारी बांधवांचे सचिन मदने आभार मानले.

ruchira top