गुरुनाथ ताम्हणकर यांना मातृशोक !
भाऊ भोगले | बागायत: मालवण तालुक्यातील माळगाव बागायत बाजारपेठेतील रहिवासी श्रीमती रोहिणी चंद्रकांत ताम्हणकर (76) यांचे अल्पशा आजाराने रविवारी रात्री उशिरा राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात 3 मुलगे, मुलगी, बहीण, सुना, जावई, पुतणे, भाचे, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक तथा मालवण केंद्रप्रमुख गुरुनाथ ताम्हणकर, माळगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य तथा उबाठा शिवसेना ज्येष्ठ पदाधिकारी राजन ताम्हणकर, सामाजिक कार्यकर्ते महेश ताम्हणकर यांच्या त्या मातोश्री तर वडाचापाट केंद्रप्रमुख श्रीमती तेजल ताम्हणकर यांच्या त्या सासूबाई होत. त्यांच्यावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

रोहिणी चंद्रकांत ताम्हणकर यांचे निधन....!
