मालवण | प्रतिनिधी: श्री बाळगोपाळ मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या वतीने पणदुर येथील ₹सविता आश्रमात निराधार वृद्धांसाठी अन्नदान तसेच मोफत केशकर्तन व दाढी सेवा उपक्रम राबविण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष मंदार आचरेकर, उपाध्यक्ष महेंद्र आचरेकर, सचिव विलास आचरेकर, खजिनदार पंकज आचरेकर, संचालक महेश शेट्ये, ज्येष्ठ सल्लागार विष्णू लाड, वामन आचरेकर,शिवराम शेट्ये, रामदास आचरेकर, राजेश भिरवंडेकर, संतोष आचरेकर, प्रथमेश शेट्ये, विशाल आचरेकर, मनस्वी आचरेकर, मंगल घाडी, निकिता आचरेकर, विद्या जाधव, प्रिया आचरेकर, विभावरी लाड, रुचिता आचरेकर, उर्मिला लाड, धनश्री आचरेकर, दर्शन आचरेकर,नितीन आचरेकर, राजू चव्हाण आणि शारदा आचरेकर उपस्थित होते.

मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

