विधिमंडळात आ. निलेश राणे यांच्या आग्रही व आक्रमक मागणी नंतर आंबा काजु उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
कोकण विभागासाठी ₹२०९.१० कोटींची विशेष मदत सरकार कडून जाहीर
आमदार निलेश राणे यांचे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी मानले आभार
मालवण | प्रतिनिधी : कोकणातील नुकसानग्रस्त आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी आग्रही स्वरूपात अभ्यासपूर्ण, मुद्देसूद आणि वस्तुस्थिती दर्शवणाऱ्या आकडेवारीसह ठाम आणि आक्रमक भुमिका मांडली. आणि अवघ्या काही तासातच शेतकऱ्यांना महायुती सरकार कडून दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने ₹३३४.९८ कोटींची मदत मंजूर केली असून, त्यापैकी कोकण विभागासाठी ₹२०९.१० कोटींची विशेष मदत जाहीर करण्यात आली आहे. विमा कंपन्यांची रक्कम यात जोडलेली नाही, ती रक्कम ही दुसऱ्या टप्प्यात येणार आहे. एकूणच आमदार निलेश राणे म्हणजे 'सर्वसामान्य जनतेचा' विधिमंडळातील 'आवाज' असून कोकणातील आंबा काजु उत्पादक शेतकऱ्यांना ही दिलासा मिळवून देण्यात त्यांची विधिमंडळातील भुमिका महत्वपूर्ण ठरली आहे. असे सांगत शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

कोकणातील शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल राज्यातील महायुती सरकार तसेच माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांचेही विनायक बाईत यांनी आभार मानले आहेत
आमदार निलेश राणे यांनी सभागृहात सरकारकडे आग्रही मागणी करत आंबा काजु बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या. त्यावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तत्काळ कार्यवाही करू असा शब्द सभागृहात दिला. त्यानुसार पुढील कार्यवाही होत १२ तासांच्या आत शासन निर्णय जाहीर होत प्रती हेक्टरी २२,५०० प्रमाणे मदत जाहीर करण्यात आली आहे. यात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ४२ हजार ३२२ शेतकऱ्यांना एकूण ७९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे, यात कुडाळ तालुक्यातील ७ हजार ७५१ शेतकऱ्यांना १२ कोटी ५७ लाख तर मालवण तालुक्यातील ७ हजार ४२९ शेतकऱ्यांना ११ कोटी २२ लक्ष नुकसानभरपाई मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त विमा कंपन्यांनाकडून नुकसानभरपाई मिळणे बाकी असून आमदार निलेश राणे यांचा त्याबाबतही पाठपुरावा सुरु आहे.
प्रयेक अधिवेशनात आमदार निलेश राणे जनतेचे ज्वलंत प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचे काम करतं आहेत. सोबतच शेकडो कोटी विकासनिधी त्यांनी मतदार संघात खेचून आणला आहे. गावातील वाडीवस्तीवर विकासनिधी पोहचला पाहिजे यासाठी त्यांचे विशेष लक्ष आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण कुडाळ मतदार संघाच्या गतिमान आणि सर्वांगीण विकास होत आहे. मागील दहा वर्षे हा मतदार संघ विकासप्रक्रियेतून मागे फेकला होता. मात्र आता आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात गतिमान विकासातून अग्रेसर होत आहे. असेही विनायक बाईत यांनी सांगितले.
▪️अमित खोत | मालवण

