आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात मांडली आक्रमक व ठाम भुमिका
नुकसानग्रस्त शेतकरी बागायतदार यांना हेक्टरी 1 लाख नुकसान भरपाईची मागणी
कृषी विद्यापीठच्या कारभारा बाबत ही व्यक्त केली तीव्र नाराजी
मालवण | प्रतिनिधी : कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने अदा करण्यात यावी. शेतकरी बागायतदारांचे आर्थिक नुकसान लक्षात घेता शासनाने त्वरीत कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी आग्रही आणि ठाम मागणी आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केली.
कृषी विभाग संदर्भात बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, मंत्री महोदय यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली व कृषी विभागाने संयुक्त क्षेत्रीय पाहाणी केली. मात्र अशी कधी पाहणीच झाली नाही. झाली असेल तर कुठल्या दिवशी झाली. कोणाकोणाला घेऊन कुठल्या टीमने कुठल्या तालुक्यात केली त्याची माहिती द्यावी.
ही कृषी विद्यापीठ कोकणात नेमके काय संशोधन करते माहिती नाही. याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना काय होतो माहिती नाही. फंडिंगच्या नावाखाली आपण राज्य सरकार म्हणून सातत्याने कृषी विभागाला पैसे देतो मात्र त्याचे रूपांतर शेतकऱ्यांच्या फायद्याचे किती होते कळायला मार्ग नाही.
त्यामुळे दिलेली माहिती चुकीची आहे.

आमदार निलेश राणे पुढे म्हणाले, अवकाळी पाऊस आला फेब्रुवारी अखेरीस, तुम्ही कृषी अधिकारी आयुक्त यांच्याकडे पत्र पाठवले ते 27 मार्च 2026 ला पाठवले. त्या नंतर परत एप्रिल महिन्यात पाठवले. अवकाळी पाऊस आला कधी फेब्रुवारीत कृषी विभागने पंचनामा मागणी केली मार्च अखेरीस. आणि त्यावर माहिती देताना सांगितले आहे, अहवाल सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे. हे साफ खोटे आहे. कारण 16 जून 2026 ला अहवाल सादर झाला आहे.
सभागृहाला चुकीची माहिती का देताय. साडेतीन महिने पंचनामा करण्यासाठी लागतात? सिंधुदुर्ग जिल्हा आहे केवढा? अधिवेशन तोंडावर अहवाल सादर होतो मंत्री महोदयांना त्याची माहिती नाही. असे अनेक सवाल आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केले.
नुकसान भरपाई बाबत तुम्ही एनडीआरएफ निकष सांगता. मग पर हेक्टरी किती नुकसान भरपाई देणार ते जाहीर करा. कोकण कुठल्या निकषात येते ते जाहीर करा.
नुकसानग्रस्त आंबा व काजु शेतकरी बागायतदार यांना हेक्टरी 50 हजार किमान व्हावी. किंवा 1 लाख मिळाली तर तुमचे अभिनंदन करू. असे आमदार निलेश राणे म्हणाले.
शेतकरी वर्गाला काहीही फायदा नसणारी व खोटे अहवाल देणारी कृषी विद्यापीठ बंद करा किंवा त्यांचे फंडिंग बंद करा. कृषी विद्यापीठ करते काय याबाबत व्हाईट पेपर काढा. सोबतच सभागृहात खोटी माहिती येता नये यासाठी संबंधित विभागाना कारवाई बाबत निर्देश द्या. असेही आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला 209 कोटी देतो म्हणता मात्र 42 हजार हेक्टर नुकसान असताना एनडीआरएफ निकषात पण बसत नाही. कुठला दर देताय तुम्ही. आंबा, काजु शेतकरी, बागायतदार यांची मागणी 1 लाख हेक्टर आहे. त्यामुळे प्रती हेक्टरी किती नुकसान भरपाई आणि कधी मिळणार हे जाहीर करावे. अशी आक्रमक आणि ठाम मागणी आमदार निलेश राणे यांनी केली.
20 वर्षापूर्वी मिळाली होती नुकसान भरपाई
2006 मध्ये आंबा व काजु शेतकरी बागायतदार यांचे मोठे नुकसान झाले होते. तेव्हा नुकसान भरपाई मिळाली. मात्र त्या नंतर आमच्या आंबा व काजु शेतकरी बागायतदार यांना काहीच मिळाले नाही. आमचा आंबा काजु शेतकरी संकटात असताना नुकसान भरपाई मागतो आहे. त्याची मागणी 50 हजार ते एक लाख पर हेक्टरी नुकसान भरपाई मागणी आहे. यां स्थितीत एनडीआरएफ निकशात किती नुकसान भरपाई मिळणार ते जाहीर करावे. कारण एनडीआरएफ चा निकष आहे 22 हजार 500 यात काय शेतकरी बागायतदार यांचे नुकसासन कसे भरून निघणार. असेही आमदार निलेश राणे म्हणाले.

