पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस मालवण शहर भाजपाच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
मालवण ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहरप्रभारी पंकज सादये, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, नगरसेवक मंदार केणी, नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेविका दर्शना कासवकर, महिला सरचिटणीस महिमा मयेकर, शिल्पा खोत, माजी नगरसेविका सेजल परब, सौ. खोबरेकर, उपशहर सन्मेष परब, मनोज मेथर, मीडिया प्रमुख रोहेश गांवकर विजय निकम, मंगेश चव्हाण, संदीप शिरोडकर यांसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
▪️अमित खोत, मालवण

