Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

"पर्यावरण न्याय, हवामान बदल आणि युवकांची भूमिका" : ऑनलाइन वेबिनार

"पर्यावरण न्याय, हवामान बदल आणि युवकांची भूमिका" : ऑनलाइन वेबिनार

मालवण | प्रतिनिधी :- अनुभव शिक्षण केंद्र, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "पर्यावरण न्याय, हवामान बदल आणि युवकांची भूमिका" या विषयावर ऑनलाइन वेबिनार पार पडला. या वेबिनारमध्ये पर्यावरण कार्यकर्त्या मेगल मार्शेलिन डिसोझा यांनी प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी विभागीय समन्वयक दिपक देवरे, जिल्हा प्रशिक्षक महादेव कोटे, अशोक वरुटे, सहदेव पाटकर, जितेंद्र राठोड हे उपस्थित होते. त्यांनी सर्वप्रथम "पर्यावरण म्हणजे काय?" याविषयी सविस्तर माहिती दिली. आपल्या सभोवतालची हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, समुद्र, जंगल आणि मानव यांच्यातील परस्परसंबंधांचा समूह म्हणजे पर्यावरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी "पर्यावरण न्याय" (Environmental Justice) या संकल्पनेवर प्रकाश टाकला. पर्यावरणीय संसाधनांचा लाभ आणि पर्यावरणीय समस्यांचा भार समाजातील सर्व घटकांमध्ये समानपणे वाटला गेला पाहिजे, हीच पर्यावरण न्यायाची मूलभूत संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड आणि नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास यांचा सर्वाधिक परिणाम आपल्या सर्वांवर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. हवामान बदलाच्या परिणामांबाबत बोलताना त्यांनी वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान, पूर, दुष्काळ, समुद्रपातळीत वाढ, जैवविविधतेचा ऱ्हास आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याविषयी माहिती दिली. हवामान बदल ही केवळ पर्यावरणीय समस्या नसून सामाजिक, आर्थिक आणि मानवी अस्तित्वाशी संबंधित गंभीर समस्या असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी "युथ बिट्स फॉर क्लायमेट" या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. नेचर ट्रेल, बर्ड रेस्क्यू ऑपरेशन, समुद्र व किनारपट्टी संवर्धन, पर्यावरण जनजागृती, दशावतार संस्कृती आणि पर्यावरण यांचा संबंध, तसेच नाट्यरूप सादरीकरणाद्वारे हवामान बदल आणि सुनामीसारख्या विषयांवर जनजागृती करण्याचे कार्य त्यांनी केलं आहे. युवकांच्या भूमिकेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, युवक हे परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहेत. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार पर्यावरण संवर्धनासाठी योगदान दिले पाहिजे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, जलसंधारण, प्लास्टिकमुक्त जीवनशैली, जैवविविधतेचे संरक्षण, स्वच्छता अभियान, पर्यावरण विषयक जनजागृती आणि हवामान न्यायासाठी आवाज उठवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

वेबिनारच्या शेवटी त्यांनी सर्व युवकांना संदेश दिला की, "ज्याला जसे जमेल तसे पर्यावरणासाठी योगदान द्या. एक झाड लावा आणि ते जगवा, पाण्याची बचत करा, पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारा आणि समाजात पर्यावरण संरक्षणाचा संदेश पोहोचवा."

हा वेबिनार पर्यावरण न्याय, हवामान बदल आणि युवकांची जबाबदारी याबाबत जागरूकता निर्माण करणारा तसेच युवकांना कृतीसाठी प्रेरित करणारा ठरला.

ruchira top