काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोडकार यांच्या हस्ते सन्मान
सावंतवाडी : सावंतवाडी येथील युवा राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत नवनियुक्त सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री.अरविंद मोंडकर यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन बाळकृष्ण पेडणेकर यांना सन्मानित करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा कॉँग्रेस पक्षाच्या जिल्ह समन्वय समिती बैठक सावंतवाडी येथे संपन्न झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल मानांकित आणि युवा राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याला जिल्हा काँग्रेस आणि सावंतवाडी तालुका काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष सत्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, जेष्ठ नेते दिलीप नार्वेकर,महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेबुलकर, ओबीसी सचिव अमिदि मेस्त्री, राजेंद्र मसुरकर, नागेश मोरये, प्रदेश सेवादल अध्यक्ष अजिंक्य गावडे, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, रवींद्र उर्फ बाब्या म्हापसेकर, कृष्णा उर्फ बाळा धाऊसकर, समीर वंजारी, सुमेधा सावंत, संजय लाड, भाई जेठे, प्रणाली नाईक, माजी नगरसेविका सुमेधा धुरी, सौ. नार्वेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाबू गवस, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नाडिस, देवानंद लुडबे, मधुकर लुडबे, संदीप सुकी, ओटवणे उपसरपंच संतोष कासकर, दादा नेवरेकर, उमेश मोंडकर, दिलीप तळगावकर, सगुण गांवकर, संजय लाड,दिलीप राणे, संतोष तावडे, सुधीर मल्हार, कौस्तुभ पेडणेकर, निलेश पावसकर, काशीराम शिरोडकर,सतीश कदम, डॉ.प्रमोद कदम, अँड. राजन यादव, दीपक जाधव, केशव जुवाटकर, उत्तम मोंडकर, अभय शेलटकर, हनु लोणे, हेमंत आरोलकर, बाळकृष्ण खोत, मुस्तफिन पाटणकर, राकेश सागवेकर, लक्ष्मण शिरोडकर आदी उपस्थित होते.
बाळकृष्ण पेडणेकर हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळामध्ये पारितोषिक प्राप्त खेळाडू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तो अव्वल दर्जाचा प्रथम क्रमांकाचा खेळाडू आहे. शालेय स्तरावर सलग चार वर्षे त्याची विभागीय आणि राज्यस्तरीय निवड झाली आहे. त्याचा बरोबर महाराष्ट्र,कर्नाटक,गोवा या राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या स्पर्धामध्ये सहभाग घेत असतो. गेल्या महिन्यात त्याने आंतरराष्ट्रीय मस्टर युरोप किंवा एब्रॉड खेळतात त्यांच्या पैकी एका आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाडूला हरविण्याचा एक भीम पराक्रम केला आहे. त्याच बरोबर माजी विश्वविजेते विश्वनाथण आनंद यांचा पुण्यात 2019 साली चेस कॅम्प झाला होता. पूर्ण भारतातून 200 खेळाडूची निवड झाली होती. त्यात बाळकृष्ण हा पूर्ण कोकणातून एकमेव निवड झालेला खेळाडू आहे.आताच विद्यमान विश्व विजेता डि.गूकेश याच्या बरोबर त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल जिल्हा काँग्रेस आणि सावंतवाडी तालुका काँग्रेस यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

