वाढत्या महागाईच्या निषेधार्थ घोषणाबाजी ; काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या हस्ते प्रांताधिकारी यांना निवेदन
सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने गॅस सिलेंडर, पेट्रोल- डिझेल दर वाढ व तुटवडा याबाबत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या हस्ते प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, सावंतवाडी मोतीतलाव ते प्रांताधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून सरकारच्या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आला.


सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या उपस्थितीत आज सावंतवाडी विधानपरिषद मतदारसंघातील विविध समस्या बाबत प्रांताधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, जेष्ठ नेते दिलीप नार्वेकर,महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेबुलकर, ओबीसी सचिव अमिदि मेस्त्री, राजेंद्र मसुरकर, नागेश मोरये, प्रदेश सेवादल अध्यक्ष अजिंक्य गावडे, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, रवींद्र उर्फ बाब्या म्हापसेकर, कृष्णा उर्फ बाळा धाऊसकर, समीर वंजारी, सुमेधा सावंत, संजय लाड, भाई जेठे, प्रणाली नाईक, माजी नगरसेविका सुमेधा धुरी, सौ. नार्वेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाबू गवस, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नाडिस, देवानंद लुडबे, मधुकर लुडबे, संदीप सुकी, ओटवणे उपसरपंच संतोष कासकर, दादा नेवरेकर, उमेश मोंडकर, दिलीप तळगावकर, सगुण गांवकर, संजय लाड,दिलीप राणे, संतोष तावडे, सुधीर मल्हार, कौस्तुभ पेडणेकर, निलेश पावसकर, काशीराम शिरोडकर,सतीश कदम, डॉ.प्रमोद कदम, अँड. राजन यादव, दीपक जाधव, केशव जुवाटकर, उत्तम मोंडकर, अभय शेलटकर, हनु लोणे, हेमंत आरोलकर, बाळकृष्ण खोत, मुस्तफिन पाटणकर, राकेश सागवेकर, लक्ष्मण शिरोडकर व अन्य उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गॅस सिलेंडरच्या किमती मुळे महिला भगिनी हैराण झाल्या आहेत.गगनाला भिडलेल्या गॅस किंमतीमुळे जनतेला घरगाडा लावताना बजेट कोलमडून जात आहे.महिना भराने सिलेंडर मिळत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या किंमती यामुळे निर्माण होणाऱ्या सामस्यांमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. हे दर तातडीने कमी करण्यात यावेत आणि जनतेला दिलासा द्यावा.

तसेच इंधन व पेट्रोल-डिझेलचा दर कमी करण्यात यावा. याठिकाणी शेतकरी वर्ग मोठ्याप्रमाणात आहे. आता पावसाळा सुरू झाला असून शेतीच्या नांगरणी साठी काही प्रमाणात पेट्रोल- डिझेल वर चालणारी लहान यंत्रे वापरली जातात त्यासाठी इंधन उपलब्ध होत नसून ते देखील कॅन मध्ये देण्यात यावे. अश्या सूचना पेट्रोल- डिझेल पपं चालकांना द्याव्यात.सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, तालुक्यातील शेतकरी कष्टकरी, महिला आणि सामान्य जनता सध्या महागाई, इंधन दरवाढ, आणि गॅस समस्यांमुळे, प्रचंड संकट आहेत. तर या मतरदर संघात मोठ्याप्रमाणात डोगरातील अवैद्य माती उत्खनन, तिलारी धरण परिसरात अवैद्य गांजा शेती लागवड याबाबत चर्चा करण्यात आली. प्रशासनाने जनतेच्या भावनांचा आदर करत जनतेला न्याय द्यावा अश्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले.


