Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

'सीएम चषक' युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा

'सीएम चषक' युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा

सिंधुदुर्ग जिल्हा संघ निवड चाचणीसाठी १२ जून पर्यत नाव नोंदणीचे आवाहन

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या "सीएम चषक" ४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मुलांचा आणि मुलींचा संघ सहभागी होणार आहे. या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी 'सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन'च्या वतीने संघ निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ज्या खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर झालेला आहे, तेच खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र असतील. अश्या इच्छुक आणि पात्र खेळाडूंनी आपली नाव नोंदणी १२ जून २०२६ पर्यंत करणे अनिवार्य आहे.

नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी अजय शिंदे (सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन) ९४२२३९४१८६ यांच्याशी संपर्क साधावा. नाव नोंदणी केलेल्या सर्व पात्र खेळाडूंची मैदानावर शारीरिक आणि कौशल्य चाचणी घेतली जाईल. या चाचणीतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारेच अंतिम सिंधुदुर्ग जिल्हा संघ (मुले व मुली) निवडला जाणार आहे.
मुख्य स्पर्धा २३ जून ते २८ जून २०२६ या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बास्केटबॉल खेळाडूंना राज्य पातळीवर आपली चमक दाखवण्याची ही एक उत्तम संधी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीसाठी आपली नाव नोंदणी करून प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी केले आहे.

ruchira top